PM Modi Pune Visit : मोदींनी घेतलं दगडूशेठ गणपतीचे दर्शन; केला ‘हा’ संकल्प

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

PM Modi Pune Visit । आज पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यात आल्यानंतर सर्वात प्रथम पंतप्रधान मोदींनी मानाचा मानला जाणारा दगडूशेठ गणपती मंदिराला भेट दिली. आज बरोबर ठीक पावणे 12 वाजता नरेंद्र मोदी दगडूशेठ गणपती मंदिरात उपस्थित होते. यावेळी त्यांनी गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. तसेच दगडूशेठ गणपतीची आरती, महाअभिषेक आणि पूजन केले. यानंतर ते एसपी कॉलेज मार्गे लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यासाठी रवाना झाले.

दगडूशेठ गणपती मंदिराला भेट देणारे मोदी पहिले पंतप्रधान – (PM Modi Pune Visit)

मोदी यांच्या हस्ते श्रीं” विधिवत पूजा व “सुखकर्ता दुःखहर्ता” व हिंदी भाषेतील आरती करण्यात आली. यावेळी त्यांनी “बाप्पा भारत विश्वगुरू होवो” आणि “चांद्रयान चंद्रावर यशस्वी उतरू दे” असा संकल्प सोडला. दगडूशेठ गणपती मंदिराला भेट देणारे (PM Modi Pune Visit) नरेेेंद्र मोदी पहिले भारतीय पंतप्रधान ठरले आहेत. यापूर्वी अनेक कलाकार, नेत्यांनी देखील दगडूशेठ गणपती मंदिराला भेट दिली आहे. यामध्ये, भारताचे राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद यांचा देखील समावेश आहे. तसेच माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, चंद्रशेखर आणि इंद्र कुमार गुजराल हे पंतप्रधान पदावर नसताना मंदिराला भेट देण्यासाठी आले होते. तसेच, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी आणि लता मंगेशकर यांनी देखील दगडूशेठ मंदिराला भेट दिली आहे.

नरेंद्र मोदी पुण्यात असल्यामुळे (PM Modi Pune Visit) राज्यसंदर्भात अनेक महत्त्वाचे निर्णय होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सकाळी पावणे अकरा वाजता नरेंद्र मोदी पुणे विमानतळावर उतरले असता त्यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वागत केले. यानंतर त्यांचा ताफा दगडूशेठ गणपती मंदिराकडे रवाना झाला. आता नरेंद्र मोदींनी लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थिती दर्शवली आहे. हा पुरस्कार संपन्न झाल्यानंतर नरेंद्र मोदी पुण्यातील विविध विकास कामांचे उद्घाटन आणि लोकार्पण करतील. यादरम्यान पुणे मेट्रोचे उद्घाटन देखील नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येईल. तिथून पुढे १:४५ ते २:१५ नरेंद्र मोदींचा राखीव वेळ असेल. ठीक २:२५ ला मोदी पुणे विमानतळाकडे प्रस्थान करतील. २:५५ वाजता नरेंद्र मोदी पुण्याचा दौरा संपवून दिल्लीसाठी रवाना होतील.