हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शंकर भगवानाचा अवतार असल्याचे वक्तव्य भाजप नेते सुरेश भारद्वाज यांनी केले आहे. हिमाचल प्रदेश येथील राम मंदिरामध्ये महाशिवरात्रीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात त्यांनी हे विधान केले.
पंतप्रधान मोदींनी २०१९ च्या निवडणुकीच्या निकालाआधी दोन दिवस केदारनाथमध्ये घालवले. या काळात ते गुहेमध्ये ध्यान करत होते. त्यानंतर निवडणुकीत मोठा विजय मिळाला याचं आजच्या महाशिवरात्रीच्या दिवशी आपण सर्वांनी स्मरण केलं पाहिजे, असंही भारद्वाज म्हणाले. “मोदींना भगवान शंकराचा आशिर्वाद मिळाला आहे. मोदी हे भगवान शंकाराचे रुप आहे. त्यामुळेच त्यांनी देशाला करोनासारख्या संकटापासून वाचवलं,” असंही भारद्वाज यांनी आपल्या भाषणात नमूद केल्याचं आऊटलूक इंडियाने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.
यापूर्वी एका भाजप नेत्याने पंतप्रधान मोदी हे हनुमानाचा अवतार असून कोरोना लस ही त्यांनी आणलेली संजीवनी आहे असं वक्तव्य केल होत.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Group