मोदींचा 70 वा वाढदिवस ; भाजपाचा ‘सेवा सप्ताह’ उपक्रम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा यंदा 70 वा वाढदिवस आहे. यानिमित्त भारतीय जनता पार्टीकडून १४ ते २० सप्टेंबर या आठवड्यात ‘सेवा सप्ताह’चे आयोजन करण्यात आले आहे. तसेच यासाठी भाजपकडून जय्यत तयारी केली जात आहे.

सेवा सप्ताह अंतर्गत भाजपाकडून देशभरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांनी देखील यासाठी कार्यकर्त्यांना सूचना केली आहे. पक्षाकडून सर्व देशभरातील सर्व भाजपा प्रदेशाध्यक्षांना सेवा सप्ताह दरम्यान कोणते कार्यक्रम घेतले जावे यासंदर्भात एक पत्रक देखील पाठवण्यात आलेले आहे. भाजपा केंद्रीय कार्यालयाचे प्रमुख व भाजपा सरचिटणीस अरूण सिंग यांनी हे पत्रक पाठवले आहे. यामध्ये सेवा सप्ताह अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या कार्यक्रमांची यादी व सामाजिक उपक्रमांसदर्भात माहिती देण्यात आलेली आहे.

पंतप्रधान मोदी यांचा यंदा ७० वा वाढदिवस असल्याने, भाजपाकडून आयोजन करण्यात आलेल्या कार्यक्रमांसाठी देखील ‘सेव्हन्टी’ ही थीम ठरवण्यात आली आहे.परिपत्रकानुसार ठरवण्यात आलेल्या कार्यक्रमांमध्ये देशभरातील प्रत्येक मंडळातील पात्र ७० व्यक्तींना कृत्रिम हात-पाय व अन्य आवश्यक साहित्य दिले जाणार आहे. ७० अंध व्यक्तिंना चष्मे दिले जाणार आहेत. याशिवाय भाजपाचे नेते कोविडच्या पार्श्वभूमीवर जारी करण्यात आलेल्या सूचनांचे पालन करत ७० रुग्णालयांमध्ये व गरीब वस्तीत फळवाटप देखील करणार आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’