हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | संयुक्त राष्ट्र महासभेच्या 76 व्या अधिवेशनात सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी चार दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर गेले आहेत. मोदी पाकिस्तानच्या हवाई हद्दीतून अमेरिकेसाठी रवाना झाले. यासाठी पाकिस्तान सरकारने परवानगी दिली होती. अफगाणिस्तानमधील परिस्थिती पाहता हा निर्णय घेण्यात आल्याचे मानले जात आहे.
दरम्यान, मोदींच्या विमानाने अमेरिकेच्या दिशेने उड्डाण केल्यानंतर मोदींनी एक फोटो ट्विट केला आहे. सोबत कॅप्शनमध्ये म्हटलं आहे की, “लांब हवाई यात्रा म्हणजे पेपर वर्क पूर्ण करण्याची, कागदी कार्यवाही पूर्ण करण्याची संधी असते.
A long flight also means opportunities to go through papers and some file work. pic.twitter.com/nYoSjO6gIB
— Narendra Modi (@narendramodi) September 22, 2021
अमेरिकेच्या प्रवासाला निघालं असता या प्रवासादरम्यान मिळालेल्या वेळात त्यांनी अनेक फाईल तपासत, त्यातील तपशील नजरेखालून घातला. अनेक कागदपत्रांवर नजरस दिली. थोडक्यात काय, सर वेळेचा सदुपयोग केला. मोदींनी केलेलं हे अभ्यासपूर्ण काम पाहून साऱ्या जगाच्याच नजरा वळल्या.