पंतप्रधान मोदी मोठा मास्टरस्ट्रोक खेळणार; 2024 ची लोकसभा निवडणूक ‘या’ राज्यातून लढवणार?

narendra modi 2024 lok sabha
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने चांगलीच कंबर कसली आहे. देशभरातील भाजप नेते आपापल्या राज्यात लोकसभेच्या निवडणुकीची जोरदार तयारी करत आहेत. देशात पुन्हा एकदा सरकार स्थापन करण्यासाठी भाजपने मिशन 350 ही जाहीर केलं आहे. त्यातच आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) 2024 ची लोकसभा निवडणूक तामिळनाडूमधून लढणार आहेत अशा चर्चा सुरु आहे. एका इंग्रजी पेपरने याबाबत वृत्त दिले आहे. नुकत्याच पार पडलेल्या नवीन संसद भवनाच्या इमारतीच्या उद्घाटनावेळी मोदींनी ज्या पद्धतीने सेंगोलची स्थापना केली, त्यालाच दक्षिण भारताच्या राजकारणाशी जोडले जात आहे.

मोदी तामिळनाडू मधून निवडणूक लढवण्यामागे पक्षाला हे दाखवून द्यायचे आहे कि देशात ज्याप्रमाणे उत्तर भारतात मोदींची जादू चालते त्याचप्रमाणे दक्षिण भारतातही आम्ही काय कमी नाही. कारण आत्तापर्यंतच्या निवडणुका जर आपण पाहिल्या तर ज्याप्रमाणे उत्तर आणि पश्चिम भारताने मोदींना डोक्यावर घेतलं त्यामानाने दक्षिणेत मात्र भाजपला आत्तापर्यंत हवे तसे यश मिळालं नाही हे मान्यच करावं लागेल.

कोणत्या मतदारसंघातून मोदी निवडणूक लढवणार –

मोदी जर तामिळनाडू मधून निवडणूक लढले तर ही त्यांची लोकसभेची दुसरी जागा असेल, कारण ते वाराणसी मधूनच पुन्हा एकदा लढणार आहे. यापूर्वी 2014 मध्ये मोदींनी वडोदरा आणि वाराणसी या दोन मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली होती तर 2019 मध्ये फक्त त्यांनी वाराणसीची निवड केली होती. मात्र आता 2024 मध्ये ते वाराणसी आणि तामिळनाडू मधील कोणत्या तरी मतदारसंघातून निवडणूक लढवतील. खास करून रामनाथपुरम या ठिकाणाहून मोदी निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

काय आहे रामेश्वरमचे महत्त्व –

रामेश्वरम हे हिंदू तीर्थक्षेत्र आहे. मोदींनी स्वत: गेल्या वर्षी काशी (वाराणसी) आणि रामेश्वरम यांच्यातील धार्मिक संबंधांवर जोर दिला होता, दोन्ही भगवान शंभू महादेवाचे निवासस्थान असल्याचे अधोरेखित केले होते आणि “तामिळनाडू ही दक्षिणेची काशी आहे” असेही मोदींनी त्यावेळी म्हटले होते. रामेश्वरम हे अॅडम्स ब्रिज (रामसेतू) च्या अगदी जवळ आहे. त्यामुळे हिंदू धर्माचे सर्वात महत्त्वाचे केंद्र असलेला हा परिसर मोदींच्या आणि खास करून भाजपच्या राजकारणालाही अनुकूल ठरेल, अशी शक्यता आहे.