नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी विज्ञान भवन येथे Depositors First: Guaranteed Time-bound Deposit Insurance Payment up to Rs 5 Lakh या कार्यक्रमाला संबोधित करतील. हा कार्यक्रम विज्ञान भवन, दिल्ली येथे दुपारी 12 वाजता होणार आहे. पंतप्रधान कार्यालयाने (PMO) शनिवारी ही माहिती दिली.
PMO ने सांगितले की,”सर्व प्रकारचे अकाउंट्स जसे की सेव्हिंग, फिक्स्ड, करंट आणि रिकरिंग डिपॉझिट्स इन्शुरन्स अंतर्गत कमर्शिअल बँकांमध्ये समाविष्ट आहेत. हे राज्य/केंद्रशासित प्रदेशांमध्ये कार्यरत राज्य, केंद्रीय आणि प्राथमिक सहकारी बँकांमधील डिपॉझिट्स देखील समाविष्ट करते.”
तुमच्या बँकेत जमा केलेल्या पैशावर 5 लाखांचा इन्शुरन्स उपलब्ध आहे
एका मोठ्या सुधारणामध्ये, सरकारने बँक डिपॉझिट्स इन्शुरन्स कव्हर 1 लाख रुपयांवरून 5 लाख रुपये केले आहे. डिपॉझिट्स इन्शुरन्सचे लिमिट प्रति बँक 5 लाख रुपये प्रति डिपॉझिटर पर्यंत वाढवल्यानंतर, गेल्या आर्थिक वर्षाच्या अखेरीस पूर्णपणे संरक्षित खात्यांची संख्या 98.1 टक्के होती. हे 80 टक्क्यांच्या इंटरनॅशनल बेंचमार्कपेक्षा खूप जास्त आहे.
डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन म्हणजेच DICGC ने अलीकडेच अंतरिम पेमेंटचा पहिला हप्ता जारी केला आहे. ही रक्कम 16 नागरी सहकारी बँकांच्या डिपॉझिटर्सना देण्यात आली आहे. या नागरी सहकारी बँकांवर रिझर्व्ह बँकेने निर्बंध लादले आहेत. एका निवेदनात म्हटले आहे की,” सुमारे एक लाख डिपॉझिटर्सच्या पर्यायी बँक खात्यांमध्ये 1,300 कोटींहून जास्त रक्कम भरली गेली आहे.”
DICGC म्हणजे काय ?
बँकांमधील 5 लाख रुपयांपर्यंतच्या डिपॉझिट्सच्या सुरक्षिततेची DICGC द्वारे हमी दिली जाते. DICGC, भारतीय रिझर्व्ह बँकेची उपकंपनी, बँक डिपॉझिट्सवर इन्शुरन्स कव्हर देते.
डिपॉझिट्सवर इन्शुरन्स कसे काम करेल ?
DICGC च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, बँकेतील प्रत्येक डिपॉझिटर्सना बँकेचा लायसन्स रद्द केल्याच्या तारखेला किंवा विलीनीकरणाच्या किंवा पुनर्बांधणीच्या दिवशी त्याच्याकडे असलेल्या मुद्दल आणि व्याजाच्या रकमेसाठी जास्तीत जास्त 5 लाख रुपयांपर्यंतचा इन्शुरन्स उतरवला जातो. याचा अर्थ असा की,एकाच बँकेत तुमच्या सर्व खात्यांमध्ये कितीही पैसे जमा केले तरी तुम्हाला फक्त 5 लाख रुपयांचे इन्शुरन्स कव्हर मिळेल. या रकमेत मूळ रक्कम आणि व्याजाची रक्कम दोन्ही समाविष्ट आहे. बँकेच्या अपयशामध्ये, जर तुमची मूळ रक्कम 5 लाख रुपये असेल, तर तुम्हाला ही रक्कम परत मिळेल आणि कोणतेही व्याज नाही.