योगा करा… निरोगी रहा!! मोदींचा देशवासियांना कानमंत्र

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज जागतिक योगा दिनानिमित्त (International Yoga Day) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी जम्मू-काश्मीरमध्ये श्रीनगर येथे योगा केला. यावेळी उपस्थितांना संभोधित करताना मोदी म्हणाले, जम्मू-काश्मीर योग साधनेची भूमी आहे. योगाचा हा अविरत प्रवास सुरु आहे. सौदी अरेबियात योगाचा एज्युकेशन सिस्टिममध्ये समावेश करण्यात आलाय असे सांगायलाही मोदी विसरले नाहीत.

मोदी म्हणाले, योगा करा आणि निरोगी रहा…. आपण 10 वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करत असताना, मी प्रत्येकाने विनंती करतो कि त्यांनी योगाला आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवावा. योग शक्ती, चांगले आरोग्य आणि निरोगीपणा वाढवतो. योगा समाजात सकारात्मक बदलाचे नवीन मार्ग तयार करत आहे. जगात योग करणाऱ्यांची संख्या वाढतेय. जगातील अनेक देशात योग दिनचर्येचा भाग बनतोय असं मोदींनी म्हंटल.

योग फक्तच विद्या नाही, विज्ञान आहे. एकाग्रता मानवी मनाची मोठी ताकद आहे. योगाच्या माध्यमातून ही एकाग्रता साध्य करणं शक्य होतय”असं पीएम मोदी म्हणाले. योगा संदर्भातील धारणा बदलल्या आहेत. नवीन योग इकोनॉमी पुढे जात आहे. ऋषिकेश, काशी ते केरळमध्ये योग पर्यटन दिसून येतेय. अस्सल योगा शिकण्यासाठी लोक जगभरातून इथे येत आहेत. लोक फिटनेससाठी पर्सनल योग ट्रेनर ठेवत आहेत. योगामुळे नवीन रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत असं नरेंद्र मोदी यांनी सांगितलं.