ऑलिम्पिकसाठी निवड झालेल्या साताऱ्याच्या पठ्ठ्याचं पंतप्रधान मोदींकडून विशेष कौतुक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नेहमीप्रमाणे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आजही आपल्या ‘मन की बात’ मधून देशवासियांशी संवाद साधला. मन की बात मधून मोदींनी ऑलिम्पिक साठी टोकियोला जाणाऱ्या भारतीय खेळाडूंचे मनोबल वाढवले. यावेळी त्यांनी ऑलिम्पिक साठी निवड झालेल्या साताऱ्याचा तिरंदाजी खेळाडू प्रवीण जाधव यांचा विशेष उल्लेख केला. मोदी म्हणाले आपल्या देशात असे अनेक खेळाडू आहेत जे छोट्या छोट्या गावातून आपल्या कष्टाच्या जोरावर पुढे आलेत.

मोदी म्हणाले प्रवीण जाधव हे साताऱ्यातील एका छोट्या गावातून पुढे आले असून ते जबरदस्त तिरंदाजी खेळाडू आहेत. प्रवीण जाधव यांचे आईवडील मोलमजुरी करतात आणि आज त्यांचा मुलगा ऑलिम्पिक साठी टोकियोला जात आहे. ही गोष्ट फक्त त्यांच्या आई वडिलांसाठीच नव्हे तर संपूर्ण देशासाठी अभिमानाची गोष्ट आहे असे मोदींनी म्हंटल.

टोकियोला जाणाऱ्या प्रत्येक खेळाडूचा स्वत: चा संघर्ष, बरीच वर्षांची मेहनत होती. ते केवळ स्वत: साठीच नव्हे तर देशासाठी जात आहेत. या खेळाडूंना भारताचा अभिमानही निर्माण करावा लागेल आणि लोकांची मने जिंकून घ्यावीत असे मोदींनी म्हंटल.

कोण आहेत प्रवीण जाधव-

सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात सरडे हे प्रवीण जाधवचं गाव. अतिशय कष्ट करत त्यानं स्वत:ला ऑलिम्पिक पात्र बनवलं.नेदरलँडमध्ये पार पडलेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या पुरु ष तिरंदाजी संघाने सांघिक स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत रौप्यपदकाची कमाई केली. तरुणदीप राय, अतानू दास या मातब्बर खेळाडूंसोबत प्रवीण जाधवनेही आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वत:ला सिद्ध केलं.आणि आता त्याला ऑलिम्पिकचे वेध लागलेले आहेत

 

Leave a Comment