देशाला हॉकी संघाचा अभिमान; ऐतिहासिक विजयानंतर मोदींकडून शाबासकी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघाने जर्मनीचा 5-4 असा पराभव करत कांस्यपदक आपल्या नावावर केलं. तब्बल 41 वर्षांनंतर हॉकी मध्ये भारताला पदक मिळाल्याने आजचा हा विजय नक्कीच ऐतिहासिक होता. दरम्यान या विजयानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हॉकी संघाचे अभिनंदन केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. “ऐतिहासिक! असा दिवस जो प्रत्येक भारतीयाच्या स्मरणात कोरला जाईल. कांस्य जिंकल्याबद्दल आमच्या पुरुष हॉकी संघाचे अभिनंदन. या पराक्रमाने त्यांनी संपूर्ण राष्ट्राची, विशेषत: आपल्या तरुणांच्या कल्पनाशक्तीवर विजय मिळवला आहे. भारताला आमच्या हॉकी संघाचा अभिमान आहे,” असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.

भारताचा ऐतिहासिक विजय-

दरम्यान, अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या लढतीत भारतीय संघ एकवेळ १-३ असा पिछाडीवर पडला होता. मात्र या पिछाडीवरून जोरदार मुसंडी मारत भारताने ५-३ अशी आघाडी घेतली आणि अखेरीस ५-४  अशा फरकाने विजय मिळवसा भारतीय हॉकी संघाने तब्बल ४१ वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकले आहे. आज झालेल्या लढतीत सिमरनजीत सिंगने दोन आणि हरमनप्रीत सिंग, रुपिंदर पाल सिंग आणि हार्दिक सिंग यांनी प्रत्येकी एक गोल करत भारताच्या या ऐतिहासिक यशात मोलाचा वाटा उचलला.

Leave a Comment