हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जी-20 शिखर संमेनलाना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, कोरोना हा साथीचा रोग मानवी इतिहासातला मोठा टर्निंग पॉईंट आहे. हे जग दुसऱ्या महायुद्धानंतरच्या सर्वात मोठ्या संकटाचा सामना करत आहे.
या बैठकीनंतर पंतप्रधानांनी ट्वीट केलं आहे की, जी-20 नेत्यांशी खूप महत्त्वाची चर्चा झाली. जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे निश्चितच आपण या महामारीमधून सावरू. या व्हर्च्युअल संमेलनाचे आयोजन केल्याबद्दल सौदी अरबचे आभार.
Had a very fruitful discussion with G20 leaders. Coordinated efforts by the largest economies of the world will surely lead to faster recovery from this pandemic. Thanked Saudi Arabia for hosting the Virtual Summit. #G20RiyadhSummit
— Narendra Modi (@narendramodi) November 21, 2020
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर जी-20 शिखर संमेलनाचे ऑनलाईन आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान सौदी अरबचे शाह सलमान यांनी शनिवारी जी-20 शिखर संमेलनाची सुरुवात केली आणि कोरोनाशी लढण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करुया, असे आवाहनही केले.
जगभरात आतापर्यंत 5 कोटी 84 लाख 75 हजार कोरोनाबधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 13 लाख 85 बाधितांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत अमेरिकेत सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. अमेरिकेत 1 कोटी 24 लाख 46 हजार कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर भारतात ही संख्या 90.9 लाखांच्या पुढे गेली आहे. भारतात आतापर्यंत 1 लाख 33 हजार 263 रुग्णांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’