नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदीआपल्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाद्वारे देशवासीयांशी संवांद साधत आहेत. पंतप्रधानांच्या मासिक रिडिओ बुलेटीनचे हे ६८ वे संस्करण आहे. या पूर्वी कारगिल विजय दिनाच्या दिवशी पंतप्रधानांनी आपल्या ‘मन की बात’ कार्यक्रमाद्वारे जनतेशी संवाद साधला होता. चला पाहूयात मोदींच्या ‘मन की बात’ मधील काही ठळक मुद्दे
★आपल्या देशात अनेक कल्पना, अनेक संकल्पना आहेत, आपल्याकडे खूप समृद्ध इतिहास आहे. आम्ही त्यांच्यावर खेळ करू शकतो का ?
★देश आज विकासाच्या दिशेने प्रवास करीत आहे. मात्र तेव्हाच या प्रवासाची सफलता सुखद असेल, जेव्हा या प्रवासात देशाचा नागरिक सहभागी असेल, या प्रवासातील एक प्रवासी असेल, या मार्गावरील एक वाटसरू असेल
★सप्टेंबर महिना हा देशभरात पोषण महिना म्हणून साजरा केला जाईल. राष्ट्र आणि पौष्टिकतेचे खूप चांगले नाते आहे. आपल्यात एक म्हण आहे – ‘ यथा अन्नम तथा मन्नम’ म्हणजे जसे आपले अन्न असते, त्या प्रमाणे आपला मानसिक आणि बौद्धिक विकास होतो
★स्वातंत्र्यलढ्यातील आपल्या देशातील ध्येयवादी नायक कोण होते याचा परिचय आजच्या पिढीला, आपल्या विद्यार्थ्यांना असला पाहिजे, ही भावना अत्यंत महत्त्वाची आहे
★कम्प्युटर गेममध्ये देखील परदेशी थीम असण्यापेक्षा भारतातीलच थीम असायला पाहिजे
★भारत देश खेळणी तयार करण्याचे केंद्र बनू शकतो- पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला विश्वास.
★देशातील तरुणांनी देशातच देशाची खेळणी तयार करावीत… चला खेळ सुरू करूनया..
★भारताने पर्यावरणाला पुरक ठरतील अशी खेळणी तयार करायला हवीत
★भारताकडे मोठी परंपरा, संस्कृती असताना खेळण्याच्या बाजारात भारताचा वाटा फारच कमी आहे
★राष्ट्रीय शिक्षण धोरणात मुलांची विशेष काळजी घेण्यात आलेली आहे
★कोरोना संकटकाळात लोकांनी संयम, साधेपणा दाखवला, गणेशोत्सव ऑनलाइन साजरा केला गेला.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’