नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘मन की बात’वर भाजप आणि पंतप्रधान कार्यालयाच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा डिसलाईक्सचा पाऊस पडला आहे. काल दसऱ्याच्या निमित्तानं मोदींनी देशवासीयांशी संवाद साधला. कोरोनाचं संकट असल्यानं सणासुदीच्या काळात काळजी घ्या. सीमेवर देशाचं संरक्षण करणाऱ्या जवानांसाठी दिवाळीत एक दिवा लावा, स्थानिक उत्पादनं खरेदी करा, लोकलसाठी व्होकल व्हा, असं आवाहन त्यांनी देशवासीयांना केलं. मात्र मोदींच्या संबोधनावर नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
काल सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनीमन की बातमधून देशवासीयांशी संवाद साधला. आज सकाळी १० पर्यंत पीएमओ इंडियाच्या यूट्यूबवर ४६ हजारांहून अधिक जणांनी मोदींचा व्हिडीओ पाहिला. या व्हिडीओला आतापर्यंत साडे तीन हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तर डिसलाईक्सची संख्या चार हजारांपेक्षा अधिक आहे. विशेष म्हणजे या व्हिडीओवरील कमेंट सेक्शन बंद करण्यात आलं आहे. त्यामुळे व्हिडीओ लाईक/डिसलाईक्स करण्यामागची कारणं समजू शकलेली नाहीत.
भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर आतापर्यंत ९६ हजारांहून अधिक जणांनी पंतप्रधान मोदींची मन की बात पाहिली. या व्हिडीओला साडे ५ हजार जणांनी लाईक केलं आहे. तर साडे ८ हजारांपेक्षा अधिक जणांनी व्हिडीओ डिसलाईक केला आहे. भाजपनं यूट्यूब चॅनलवरील कमेंट सेक्शन सुरू ठेवलं आहे. या कमेंट सेक्शनवर नजर टाकल्यास अनेकांनी कोरोना संकट, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिहारमध्ये देण्यात आलेलं मोफत कोरोना लसीचं आश्वासन, शेतकऱ्यांच्या समस्या, रोजगार हा मुद्द्यांचा उल्लेख केला आहे.
शेतकऱ्यांनंतर व्यापारी मोदी सरकारविरोधात आक्रमक; राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव बेमुदत बंद
वाचा सविस्तर –
https://t.co/ymWBXCVahY#FarmersProtest #OnionPriceHike #OnionPrice #HelloMahrashtra— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 26, 2020
उपमुख्यमंत्री अजित पवारांना कोरोनाची लागण, उपचारांसाठी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
वाचा सविस्तर -👉 https://t.co/N4VrZJ0EsI@AjitPawarSpeaks @NCPspeaks #coronamaatregelen #coronavirus #Corona #HelloMaharashtra— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 26, 2020
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in