शिवरायांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी पंतप्रधान मोदींनी नतमस्तक होऊन मागितली माफी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (30) महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. वाढवण बंदराच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी त्यांनी उपस्थिती लावली. यावेळी बोलताना त्यांनी सर्वप्रथम मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेवरून माफी मागत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

मी आज नतमस्तक होऊन त्यांची माफी मागतो…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं की काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्ग मध्ये जे काही घडलं ते अत्यंत दुःखद आहे शिवाजी महाराज हे फक्त नाव नाही तर ते आमचे आराध्य दैवत आहेत. मी आज नतमस्तक होऊन त्यांची माफी मागतो. तसेच जे लोक छत्रपती शिवाजी महाराजांना आराध्य मानतात या घटनेमुळे त्यांच्या मनालाही जे वेदना झाल्या आहेत. मी त्यांच्यापुढेही नतमस्तक होऊन त्यांची माफी मागतो असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

विरोधकांना प्रत्युत्तर…

पुढे बोलताना मोदींनी त्यांच्यावर होत असलेल्या टीकेला सुद्धा प्रत्युत्तर दिले. यावेळी बोलताना ते म्हणाले , ” आमचे संस्कार वेगळे आहेत त्या लोकांसारखे नाहीत जे महाराष्ट्राचे सुपुत्र असलेल्या वीर सावरकरांना शिव्या देतात. विरोधकांनी अनेकदा सावरकरांना अपमानित केलं आहे. तसेच देशभक्तीच्या भावनेला पायदळी तुडवलय मात्र त्यांनी कधीही वीर सावरकर यांची माफी मागितलेली नाही. सावरकरांचे संस्कार आता महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती झालेत. हे आमचे संस्कार आहेत. मी महाराष्ट्राच्या भूमीत येऊन सर्वात आधी छत्रपती शिवरायांची माफी मागितली आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

एकाच प्रकल्पामुळे 12 लाख रोजगार

2014 आधी वाढवण बंदराचे काम रोखून धरण्यात आलं होतं. आमचं सरकार आल्यानंतर आम्ही या प्रकल्पाच्या कामावर अधिक भर दिला. काम सुरू केलं तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पासाठी मेहनत घेतली. मात्र 2019 साली आमची सत्ता गेली तेव्हा अडीच वर्ष पुन्हा या प्रकल्पाचा काम रखडलं. या एकाच प्रकल्पामुळे 12 लाख रोजगार उपलब्ध होण्याची शक्यता आहे. एवढी मोठी गुंतवणूक कोणी रोखून धरली हे महाराष्ट्राच्या जनतेने विसरू नये. काही लोक महाराष्ट्राचा विकास रोखण्याचा प्रयत्न करतात. मात्र केंद्रातील एनडीए सरकार आणि राज्यातील महायुती सरकार महाराष्ट्राला देशात नंबर वन राज्य बनवायचं आहे अशी प्रतिक्रिया आहे मोदी यांनी दिली.