कोरोनावरील लस कधी येणार?? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली ‘ही’ महत्त्वाची माहिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून तेथील कोरोनाची परिस्थिती आणि पुढील रणनीती जाणून घेतली. यावेळी उपस्थित असलेल्या आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी कोरोनाविरोधातील रणनीती आणि लसीकरणाबाबतची आपली भूमिका मांडली. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कोरोनावरील लसीबाबत मोठे विधान केले आहे.

आजच्या बैठकीला उपस्थित मुख्यमंत्र्यांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनावरील लसीबाबत हे विधान केले. मोदी म्हणाले की, कोरोनावरील लस कधीपर्यंत येईल हे याची वेळ आम्ही निश्चित करू शकत नाही. तर ही बाब पूर्णपणे शास्त्रज्ञांच्या हातात आहे. लस येईल तेव्हा येईल. पण कोरोनाबाबत सतर्क राहा. हयगय करू नका, असंही त्यांनी सांगितलं. काही लोक याबाबत राजकारण करत आहेत. मात्र अशा लोकांना राजकारण करण्यापासून रोखता येणार नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत झालेल्या या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेदेखील उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज्यातील कोरोनाची परिस्थिती आणि पुढील उपाययोजनांबाबत पंतप्रधानांना माहिती दिली. कोरोना लसीबाबत आम्ही सिरम इन्स्टिट्यूटचे अदर पुनावाला यांच्याशी सातत्याने बोलत आहोत. महाराष्ट्रात लसीकरण कशा रितीने करावे, लसीचे वितरण या संदर्भात टास्क फोर्स देखील स्थापन करण्यात आला आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like