पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज नव्या संसदेच्या इमारतीचं भूमीपूजन ; पहा कस असेल नवं संसद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नव्या संसदेच्या इमारतीचं भूमीपूजन करणार आहेत. जवळपास 80 वर्षांनी देशात नवं संसद भवन निर्माण करण्यात येणार आहे. नवे संसदभवन गोल नव्हे त्रिकोणी आकाराचे असेल तसेच नवीन संसद भवनात लोकसभेचा आकार आता असलेल्या सभागृहाच्या तुलनेने तीन पटीने जास्त आहे. इतकंच नाही तर राज्यसभेचा आकारही मोठा असल्याचं सांगण्यात येत आहे.

टाटा प्रोजेक्ट्स लि. करणार बांधकाम इमारतीचं बांधकाम

टाटा प्रोजेक्ट लिमिटेडकडून एकूण 64,500 चौरस मीटर क्षेत्रामध्ये नवीन संसदेची इमारत बांधली जाणार आहे. नवीन संसद भवनाची रचना एचसीपी डिझाईन प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडने तयार केली आहे. नागरी व्यवहार मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन संसदेची इमारत ही नव्या भारताच्या गरजा आणि आकांक्षानुसार असणार आहे. पुढील 100 वर्षांच्या गरजा लक्षात घेऊन ही इमारत तयार केली जाणार आहे. जेणेकरुन भविष्यात खासदारांची संख्या वाढली तरी कोणतीही अडचण उद्भवणार नाही.

संसदेच्या या नव्या इमारतीला 4 मजले, 6 प्रवेशद्वार असतील. लोकसभेचे 1 हजार, तर राज्यसभेचे साधारण 400 खासदार बसू शकतील अशी बैठक व्यवस्था असणार आहे. सध्या खासदारांना प्रत्येकाच्या आसनासमोर टेबल नाहीत. नव्या संसदेत प्रत्येकासमोर छोटे बाक असणार आहे. या बाकांमध्ये हजेरी नोंदवण्यासाठी, मतदान करण्यासाठी, भाषातंर ऐकण्यासाठी अत्याधुनिक व्यवस्था असेल. याशिवाय 120 कार्यालये, म्युझियम, गॅलरीही या इमारतीत असणार आहे.

नव्या संसदभवनाची वैशिष्ट्ये

  1. नवे संसदभवन गोल नव्हे त्रिकोणी आकाराचे

  2. संसदभवन स्वातंत्र्यांच्या 75 व्या वर्षी अर्थात ऑगस्ट 2022 पर्यंत बांधकाम पूर्ण

  3. संसद भवनाला 861.90 कोटी रुपयांचा खर्च

  4. केंद्रीय सचिवालय 2024 पर्यंत तयार होणार

  5. लोकसभा-राज्यसभेतील रचना महाराष्ट्र विधानसभेसारखी

  6. 64,500 स्क्वे.मी. अंतरावर असेल संसदभवन

  7. बांधकामात 2 हजार प्रत्यक्ष, 9 हजार अप्रत्यक्ष कारागिर

  8. एकूण 1,272 खासदार एकाच वेळी बसण्याची क्षमता

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment