PM Suryoday Yojana : राज्यातील 7 जिल्ह्यांत घरावर बसणार सोलर; असा करा अर्ज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

PM Suryoday Yojana : देशातील नागरिकांना जास्त वीजबिलाचा त्रास होऊ नये यासाठी केंद्र सरकार गेल्या काही वर्षांपासून सौरऊर्जेला चालना देत आहे. यापूर्वी केंद्र सरकार कडून शेतीसाठी लागणाऱ्या पाण्यासाठी पंतप्रधान कुसुम योजना ही सौरऊर्जा योजना आणली होती. या योजनेच्या माध्यमातून सौर ऊर्जा पॅनल बसवण्यासाठी अनुदान स्वरूपात मदत सुद्धा सरकार कडून करण्यात येत होती. आताही मोदी सरकारने प्रत्येकाच्या घरावर सोलर बनवण्याचा मानस आखला आहे. प्रधानमंत्री सूर्योदय योजना अशी सरकारची ही नवी योजना असून नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पात याबाबत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी माहिती दिली होती.

प्रधानमंत्री सूर्योदय योजनेअंतर्गत (PM Suryoday Yojana) देशभरातील जवळपास १ कोटी घराच्या छतावर सौर पॅनल बसवून नागरिकांचे वीज बिल कमी करणे आणि त्यांना विजेच्या गरजांसाठी खऱ्या अर्थाने स्वावलंबी करणं हे सरकारचे मुख्य ध्येय आहे. केंद्र सरकारच्या या योजनेच्या माध्यमातून आता जे नागरिक कमी आणि मध्यम उत्पन्न गटातील आहेत त्या नागरिकांना आता रूप-टॉप सौर ऊर्जेच्या माध्यमातून वीज उपलब्ध करून मिळेल. जे रहिवासी क्षेत्रातील ग्राहक आहेत त्यांना छतावरील सौरऊर्जेचा मोठ्या प्रमाणात अवलंब करण्यास प्रवृत्त करण्यासाठी एक व्यापक राष्ट्रीय मोहीम सुरू करावी, असे निर्देशही मोदींनी दिले होते.

महाराष्ट्र्रातील या जिल्ह्यांमधील लाखो घरांवर बसणार सोलर-

प्रधानमंत्री सूर्योदय योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सुद्धा एकूण ७ जिल्ह्यातील लाखो घरांवर सोलर पॅनल सुरु करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. यामध्ये पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, लातूर, नागपूर आणि अकोला या जिल्ह्यांचा समावेश आहे. यातील प्रत्येक जिल्ह्यात २५ हजार घरांवर म्हणजेच एकूण पावणेदोन लाख घरांना सौरऊर्जेची वीज मिळेल. 31 मार्च 2024 पर्यंत हे सोलर बसवण्याची मुदत देण्यात आली आहे.

प्रधानमंत्री सूर्योदय योजनेच्या (PM Suryoday Yojana) माध्यमातून सौर पॅनेल बसविण्यासाठी समजा तुम्हाला 1 KW सौर पॅनेल बसवायचं असेल तर यासाठी तुमच्याकडे 10 चौरस मीटर जागा असणे गरजेचं आहे. नागरिकांना 3 किलोवॅटपर्यंतचे सोलर पॅनल बसवण्यासाठी 40% सवलत दिली जाईल, तर 3 KW ते 10 KW सोलर पॅनल बसवण्यासाठी 20% सवलत दिली जाईल.. तुम्ही जर ऑफिस आणि कारखान्यांच्या छतावर सौर पॅनल बसवले तर विजेच्या खर्चामध्ये मोठी बचत होऊन अंदाजे 30 ते ४० टक्क्यांपर्यंत तुमचा खर्च वाचेल.

कुठे करावा अर्ज – PM Suryoday Yojana

तुम्हाला जर प्रधानमंत्री सूर्योदय योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर केंद्र सरकारच्या solarrooftop.gov.in अधिकृत वेबसाईटवर जाऊनतुम्हाला अर्ज करावा लागेल. या अर्जांच्या आधारेच या योजनेच्या माध्यमातून सोलर रूफटॉफ साठी लाभ दिला जाणार आहे