PM Svanidhi Yojana : स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी केंद्र सरकार देत ​​आहे विना गॅरंटी कर्ज, अशा प्रकारे मिळवा फायदा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । PM Svanidhi Yojana : देशातील गरीब घटकांना स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याच्या कामात मदत करण्यासाठी केंद्र सरकारकडून एक योजना राबविली जाते आहे. ज्याअंतर्गत सरकारकडून कोणत्याही गॅरेंटीशिवाय कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. खास रस्त्यावरील विक्रेत्यांसाठी सुरु करण्यात आलेल्या या योजनेचे नाव पीएम स्वानिधी योजना असे आहे. हे जाणून घ्या कि, दोन वर्षांपूर्वी आलेल्या कोरोनामुळे अनेक रस्त्यावरील विक्रेत्यांचे व्यवसाय उद्ध्वस्त झाले आहेत. ज्यामुळे या लोकांना पुन्हा व्यवसाय सुरू करता यावा यासाठी सरकारने ही योजना सुरू केली आहे.

Street Vendors Without ID Cards Not To Operate In Kochi From December 1:  Kerala High Court

रस्त्यावरील विक्रेत्यांसाठी खास योजना

रस्त्यावरील विक्रेत्यांना आपला व्यवसाय पुन्हा सुरू करता यावा या कारणासाठी पीएम स्वानिधी योजनेअंतर्गत सरकारकडून कर्ज उपलब्ध करून दिले जाते. यामध्ये भाजी विक्रेते, फळ विक्रेते आणि लहान फास्ट फूडची दुकाने लावणाऱ्यांचा समावेश आहे. या योजनेंतर्गत कर्ज घेण्यासाठी कोणत्याही प्रकारची गॅरेंटी द्यावी लागत नाही. तसेच या योजनेअंतर्गत आवश्यक कागदपत्रांच्या आधारे आपल्याला कर्जासाठी अर्ज करता येईल. PM Svanidhi Yojana

PM Svanidhi Yojana

मिळेल 50 हजारांपर्यंत कर्ज

हे जाणून घ्या कि, या योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून 50,000 रुपयांपर्यंतचे कर्ज मिळते. मात्र त्यासाठी आधी कर्ज घेणाऱ्याला स्वतःची विश्वासार्हता तयार करावी लागेल. या योजनेंतर्गत कोणत्याही व्यक्तीला आधी 10,000 रुपयांचे कर्ज मिळेल. या कर्जाची परतफेड केल्यानंतर दुसऱ्यांदा कर्ज दुप्पट रक्कम मिळेल. तसेच यामध्ये अर्ज मंजूर झाल्यानंतर कर्जाची रक्कम अर्जदाराच्या खात्यामध्ये तीन हप्त्यांमध्ये ट्रान्सफर केली जाईल. PM Svanidhi Yojana

PM Svanidhi Yojana

आधार नंबर देणे बंधनकारक

सरकारकडून डिजिटल पेमेंटला इन्सेन्टिव्ह देण्यासाठी रस्त्यावरील विक्रेत्यांसाठी कॅश-बॅकसहीत या योजनेचे बजटही वाढवण्यात आले ​​आहे. या योजनेअंतर्गत घेतलेल्या कर्जाची रक्कम एका वर्षाच्या कालावधीमध्ये परत करता येऊ शकते. यामध्ये कर्जाची रक्कम दरमहा हप्त्यांमध्ये परत करता येते. तसेच या योजनेअंतर्गत कर्ज घेण्यासाठी कोणत्याही सरकारी बँकेमध्ये अर्ज करता येईल. मात्र यासाठी अर्जदाराला आधार नंबर देणे बंधनकारक आहे. PM Svanidhi Yojana

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://pmsvanidhi.mohua.gov.in/

हे पण वाचा :
Bank FD : ‘या’ खाजगी बँकेने FD वरील व्याजदर पुन्हा वाढवले, नवीन दर तपासा
Sukanya Samriddhi Yojana मधून वेळेआधीच पैसे काढण्यासाठी अशा प्रकारे करा अर्ज
Post Office च्या ‘या’ योजनेमध्ये पैसे गुंतवून मिळवा दुप्पट नफा !!!
Multibagger Stock : चॉकलेट बनवणाऱ्या ‘या’ कंपनीच्या शेअर्सने 1 महिन्यात गुंतवणूकदारांचे पैसे केले तिप्पट
Gold Price : आठवड्याभरात सोन्याची झळाळी वाढली तर चांदी पडली फिकी, जाणून घ्या सराफा बाजाराची आठवडाभराची स्थिती