Sukanya Samriddhi Yojana मधून वेळेआधीच पैसे काढण्यासाठी अशा प्रकारे करा अर्ज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Sukanya Samriddhi Yojana : सुकन्या समृद्धी खात्यामध्ये सर्व सरकारी बचत योजनांपेक्षा जास्त व्याज दिले जाते. त्यासोबतच यामधील गुंतवणुकीवर कर सवलत देखील मिळते. तसेच या खात्याद्वारे आपल्या मुलीच्या भविष्यासाठी मोठा फंड जमवता येतो. हे पैसे सामान्यता मुलीच्या 21 वर्षांनंतर परत मिळतात. मात्र लग्न, गंभीर आजार, उच्च शिक्षण किंवा परदेशात जाणे यांसारख्या काही कारणांमुळे वेळेआधी देखील हे पैसे काढता येतात. तर आज आपण सुकन्या समृद्धी योजनेतून वेळे आधीच पैसे कसे काढायचे ते जाणून घेउयात…

कोणत्याही भारतीय नागरिकाला आपल्या 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीसाठी बँक अथवा पोस्ट ऑफिसमध्ये सुकन्या समृद्धी खाते (Sukanya Samriddhi Yojana) उघडता येते. तसेच या खात्यात दरवर्षी किमान 250 रुपये आणि जास्तीत जास्त 1.50 लाख रुपये जमा करता येतात. सुकन्या समृद्धी खात्यातून पैसे काढण्याचे नियम खालीलप्रमाणे आहेत-

Save Rs 1 daily, get benefit of Rs 15 lakh on maturity; Know where to  invest- | Business News – India TV

मुलीच्या लग्नासाठी

आपल्या मुलीच्या वयाच्या 18 व्या वर्षी लग्न झाले तर या खात्यातील 50 टक्के रक्कम काढता येतील. मात्र मागील आर्थिक वर्षाच्या एकूण शिल्लक असलेल्या रकमेच्या 50 टक्के हे प्रमाण असावे. यासाठी मुलीच्या लग्नाच्या एक महिन्याआधीपासून ते लग्नानंतरच्या तीन महिन्यांपर्यंत पैसे काढता येतील. Sukanya Samriddhi Yojana

उच्च शिक्षणासाठी

जर आपल्या मुलीच्या 10वी नंतरच्या उच्च शिक्षणासाठी पैशांची गरज असेल, तर मुलगी 18 वर्षांची झाल्यानंतर 50 टक्के रक्कम काढता येईल. मात्र ही रक्कम मागील आर्थिक वर्षाच्या एकूण शिल्लक रकमेच्या 50 टक्के असावी. यासोबतच मुलीच्या उच्च शिक्षणासाठीचे पुरावे द्यावे लागतील.

मुलीचा मृत्यू झाल्यास

जर या योजनेच्या मॅच्युरिटीआधीच मुलीचा मृत्यू झाला तर पालकांना या योजनेत गुंतवलेले पैसे व्याजासहीत मिळतील. मात्र, यासाठी मुलीच्या मृत्यूचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल. Sukanya Samriddhi Yojana

Sukanya Samriddhi Account (SSA) Scheme: Know Objectives, Eligibility,  Rules, Features, and More

अशा परिस्थितीत खाते करता येते बंद

जर मुलीच्या पालकांचा मॅच्युरिटी आधीच मृत्यू झाला तर हे खाते मध्येच बंद केले जाऊ शकते. मात्र ही सुविधा देखील खाते उघडल्यानंतरच्या 5 वर्षांनी मिळते.

खातेदार मुलीला एखादा जीवघेणा आजार झाला असेल आणि उपचारासाठी पैसे हवे असतील तर हे खाते बंद करता येईल. मात्र ही सुविधा 5 वर्षानंतरच मिळेल.

आपण भारताचे नागरिकत्व सोडले तर हे खाते बंद मानले जाते. या प्रकरणात, व्याज जोडून सर्व पैसे परत केले जातील. मात्र जर आपण दुसऱ्या देशात स्थायिक झाला असाल आणि भारताचे नागरिकत्व सोडले नसेल तर हे खाते मॅच्युरिटी होईपर्यंत सुरू ठेवता येईल.

answer to every question related to Sukanya Samriddhi Yojana faq interest  investment account deposit withdrawl rules and regulation - सुकन्‍या  समृद्धि योजना से जुड़े हर सवाल का यहां है जवाब

पैसे काढण्याच्या इतर अटी जाणून घ्या

Sukanya Samriddhi Yojana तून पैसे काढताना, अर्जासोबत मुलीला तिची ओळख दशविणारे एखादे इंडेंटिटी प्रूफ म्हणजेच ओळखपत्र द्यावे लागेल. तसेच भारतीय नागरिकत्वाचा पुरावा द्यावा लागेल. या कामांसाठी आधारकार्ड, मतदार ओळखपत्र आणि पासपोर्टची देखील चालणार आहेत.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : http://www.nsiindia.gov.in/InternalPage.aspx?Id_Pk=89

हे पण वाचा :
PPF मधील गुंतवणूकीबाबत आले मोठे अपडेट, हे जाणून घेतल्याशिवाय गुंतवू नका पैसे
LIC Jeevan Azad : ‘या’ नवीन पॉलिसी अंतर्गत मिळतील अनेक फायदे, त्याविषयी जाणून घ्या
Budget 2023 : रेल्वे अर्थसंकल्प सामान्य बजटचा भाग बनण्याचा रंजक इतिहास जाणून घ्या
PIB Fact Check : केंद्र सरकार सर्व विद्यार्थ्यांना देणार मोफत लॅपटॉप, तपासा ‘या’ व्हायरल मेसेजमागील सत्यता
Layoffs : कोरोनानंतर आता मंदीची भीती… आयटी सेक्टरमध्ये कपातीची वेळ का आली ???