कोरोना संशयितांचा सर्वे करण्यासाठी पुणे मनपा कर्मचारी घराघरात जाणार, मात्र दर्जाहीन मास्क अन् अपुऱ्या सेनिटायझर विनाच?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे प्रतिनिधी | देशात कोरोनाने अक्षरशः थैमान घातले आहे. देशात आत्तापर्यंत कोरोनाचे ८७३ रुग्ण सापडलेत तर राज्यात १६७ रुग्ण पोझिटीव्ह सापडले आहेत. पुण्यात एकुण २० रुग्ण सापडले आहेत. मात्र मागील ५४ तासात शहरात एकही रुग्ण न सापडल्याने पालिका प्रशासनाने कोरोनावर केलेली उपाययोजना योग्य असल्याचे दिसत अाहे. आता पुणे मनपा नागरिकांच्या घराघरात जाऊन कोरोनाची संशयितांचा सर्वे घेणार आहे. यासाठी मनपाच्या शिक्षकांची नेमणुक करण्यात आली आहे. मात्र या शिक्षकाणा चांगल्या दर्जाचे मास्क आणि पुरेसे सेनिटायझर देण्यात आलेले नाहीत अशी माहिती समोर आली आहे.

स्वत:चा जीव धोक्यात घालून घरोघरी कोरोना चाचणी घेण्याकरता जाणार्‍या मनपा शिक्षकांना अतिशय निकृष्ट दर्जाचे मास्क देण्यात आल्याचे समजत आहे. संपूर्ण पुणे महानगरपालिकेसाठी पहिल्या यादीत ५३५ शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये ६२ % महिला आहेत.  एका श्रेत्रीय कार्यालयात अंतर्गत श्रेत्रीय कार्यालयातील कर्मचारी, कोरोना सर्वेक्षणासाठी नेमणूक केलेले कर्मचारी अशा सर्व कर्मचा-यांची संख्या २०० पेक्षा जास्त आहे. तरी, गेल्या काही दिवसांत एका श्रेत्रीय कार्यालयाला २ टप्प्यांत फक्त २०० साधे मास्क आणि ४० सॅनिटायझर उपलब्ध झाले आहेत. सर्वेक्षणाच्या एका टीममध्ये एकच सॅनिटायझर दिला गेलेला आहे. तो १०-१५ दिवस वापरायचा आहे. तसेच देण्यात आलेले मास्क हे निकृष्ट दर्जाचे असून ते आमचे कोरोनापासून संरक्षन करु शकणार नाहीत असे शिक्षकांचे म्हणणे आहे. तसेच १५ दिवसांकरता २० सेनिटायझर कसे वाोरायचे हा प्रश्न आहे असंही शिक्षक म्हणत आहेत.

नेमणुक करण्यात आलेल्या एकुण शिक्षकांपैकी ६२ % संख्या ही महिला शिक्षकांची आहे. यातील बहुतांश महिला शिक्षकांच्या घरात १-२ वर्षांची मुलं आहेत. तेव्हा याचा विचार करुन पुणे मनपा प्रशासनाने पिंपरी चिंचवड महापालिकेप्रमाणे कोरोना चाचणी घेण्यासाठी पुरुषांना प्राधान्य द्यावे अशी मागणी शिक्षकांकडून करण्यात येत आहे.  शिक्षकांप्रमाणेच पोलिस कर्मचारी आणि आरोग्य कर्मचारी यांचे आरोग्यही टांगणीला असून सर्वांना पुरेशी सामुग्री मिळत नसल्याची तक्रार येत आहे. तेव्हा पालिका प्रशासनाने N मास्क, पुरेसे सॅनिटायझर आणि हॅन्ड ग्लोज द्यावेत अशी मागणी शिक्षकांनी आयुक्तांकडे केली आहे. 

दरम्यान देवदुतासारखे स्वत:चा जीव धोक्ययात घालून शिक्षक, आरोग्य विभाग कर्मचारी, विद्युत कर्मचारी, लिपिक, अन्न‌ निरीक्षक पुणे मनपा कर्मचारी कोरना सर्वेक्षणासाठी नेमलेले आहेत. शासकीय कर्मचार्‍यांच्या आरोग्याकडे महापालिका प्रशासन लक्ष देणार का हा प्रश्न आहे. सेनिटायझर आणि मास्क यांचा तुटवडा असला तरी या कर्मचार्‍यांना ते मिळणे अतिशय गरजेचे आहे. अशाने शिक्षक स्वत:‌ कोरोना वाहक होवू शकतात. कोणाचे आरोग्य धोक्यात घालून चांगल्या आरोग्यासाठी लढा देणे कदापि स्विकार्हार्य राहणार नाही याची प्रशासनाने नोंद घेणे गरजेचे आहे.

 

 

Leave a Comment