हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । PMSBY : कोरोना काळानंतर लोकं भविष्याबाबत जास्त सजग झाले आहेत. ज्यामुळे लोकांकडून मोठ्या प्रमाणावर लाईफ इन्शुरन्स घेतला जातो आहे. तसे पहिले तर अनेक कंपन्यांकडून लाईफ इन्शुरन्स प्लॅन ऑफर केले जातात. मात्र प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) द्वारे अत्यंत कमी प्रीमियमवर लाईफ इन्शुरन्सची सुविधा मिळते. हे लक्षात घ्या कि, पीएमएसबीवाय ही केंद्र सरकारची एक अशी योजना आहे, ज्या अंतर्गत खातेदाराला फक्त 12 रुपयांमध्ये 2 लाख रुपयांचा इन्शुरन्स कव्हर मिळतो. चला तर मग या योजनेबाबत जाणून घेऊयात…
काही वर्षांपूर्वी केंद्र सरकारकडून नाममात्र प्रीमियमवर प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना सुरू करण्यात आली होती. या पीएमएसबीवायचा वार्षिक प्रीमियम फक्त 12 रुपये आहे. हा प्रीमियम मे महिन्याच्या शेवटी भरावा लागेल. ही रक्कम 31 मे रोजी आपल्या बँक खात्यामधून आपोआप कापली जाईल. त्यामुळे जर आपण पीएमएसबीवाय घेतले असेल तर आपल्या बँक खात्यामध्ये बॅलन्स ठेवणे महत्वाचे आहे.
PMSBY च्या अटी जाणून घ्या
18 ते 70 वर्षांपर्यंतच्या लोकांना PMSBY योजनेचा लाभ घेता येईल. फक्त 12 रुपये वार्षिक प्रीमियम असलेला पीएमएसबीवाय पॉलिसीचा प्रीमियम देखील थेट बँक खात्यातून कापला जाईल. मात्र पॉलिसी खरेदी करताना आपले बँक खाते पीएमएसबीवायशी लिंक केलेले असायला हवे. या पॉलिसीनुसार, इन्शुरन्स खरेदी करणाऱ्या ग्राहकाचा जर मृत्यू झाला किंवा अपंगत्व आल्यास त्याच्या अवलंबितांना 2 लाख रुपये मिळतील.
अशा प्रकारे करा रजिस्ट्रेशन
या पॉलिसीसाठी बँकेच्या कोणत्याही शाखेत जाऊन अर्ज करता येतो. बँक मित्रही घरोघरी PMSBY घेत आहेत. यासाठी इन्शुरन्स एजंटशीही संपर्क साधता येईल. त्याचबरोबर सरकारी इन्शुरन्स कंपन्या आणि अनेक खाजगी इन्शुरन्स कंपन्या देखील ही योजना विकतात.
प्रीमियम ऑटो-डेबिट मोडद्वारे जमा केला जाईल
या इन्शुरन्सचा प्रीमियम ऑटो-डेबिट मोडद्वारे जमा केला जातो. तसेच ही पॉलिसी 1 जून ते 31 मे पर्यंत व्हॅलिड असेल. या पॉलिसीचे फायदे मिळविण्यासाठी, आपल्याकडे बँकेचे खाते असणे आवश्यक आहे. तसेच ही पॉलिसी आपल्या खात्याशी जोडली गेलेली असावी. याच्या ऑटो-डेबिट मोडमुळे अनेक वेळा लोकांना समस्या येतात. अशा परिस्थितीत, पॉलिसीधारक ते डीएक्टिवेट देखील करू शकतो.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://financialservices.gov.in/insurance-divisions/Government-Sponsored-Socially-Oriented-Insurance-Schemes/Pradhan-Mantri-Suraksha-Bima-Yojana(PMSBY)
हे पण वाचा :
HDFC Bank ने ग्राहकांना दिला धक्का !!! आता EMI साठी मोजावे लागणार जास्त पैसे
Redmi Clearance Sale : फक्त 4,499 रुपयांमध्ये घरी आणा Redmi चा ‘हा’ पॉवरफुल फोन
Multibagger Stock : सॉक्स बनवणाऱ्या ‘या’ कंपनीने गुंतवणूकदारांना एका वर्षात दिला 3 पट नफा !!!
Bandhan Bank च्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी !!!! FD वर मिळणार 8% पर्यंत व्याज
Aadhar Card मधील माहिती अपडेट करण्यासाठी किती खर्च येतो हे जाणून घ्या