हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । PNB : RBI कडून गेल्या महिन्यात दुसऱ्यांदा रेपो दरात वाढ करण्यात आली. ज्यानंतर जवळपास सर्वच बँकांनी आपल्या व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात केली. मात्र एकीकडे कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याबरोबरच बँकांकडून डिपॉझिट्सवरील व्याजदरातही वाढ केली आहे. या दरम्यानच आता सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब नॅशनल बँकेने FD वर व्याजदर वाढवले आहेत.
PNB कडून याआधीही एफडीवरील दरात वाढ केली गेली होती. PNB ने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी FD योजनेवरील व्याज वाढवण्याची घोषणा केली आहे. नवीन व्याजदर 20 जुलै 2022 पासून लागू झाले आहेत.
असे असतील नवीन व्याजदर
PNB ने 7 ते 45 दिवसांच्या एफडीवरील व्याजदर 3 टक्क्यांवर स्थिर ठेवले आहेत. आता बँक 46 ते 90 दिवसांच्या एफडीवर 3.25 टक्के व्याज देईल. 91 ते 179 दिवसांच्या FD वर 4 टक्के व्याज द्यावे लागेल तर 180 दिवस आणि एक वर्षापेक्षा कमी मुदतीच्या FD वर 4.50 टक्के व्याज मिळेल. तसेच PNB कडून एका वर्षाच्या FD वर 5.30 टक्के व्याजदर मिळेल.
PNB कडून आता एक वर्षापेक्षा जास्त आणि एक वर्षापर्यंतच्या FD च्या व्याजदरात 15 बेस पॉईंट्सनी वाढ करत 5.45 टक्के केला आहे. आता बँक 2 वर्षांपेक्षा जास्त आणि 3 वर्षांपर्यंतच्या FD वर 5.50 टक्के व्याजदर देईल. त्याचबरोबर PNB ने 3 वर्षांपेक्षा जास्त आणि 5 वर्षांपर्यंतच्या FD वर 0.25 टक्क्यांनी 5.75 टक्के व्याजदर वाढवला आहे. 5 वर्षांपेक्षा जास्त आणि 10 वर्षांपर्यंतच्या FD वर 5.60 टक्के व्याजदर असेल. बँकेने 1111 दिवसांच्या FD वरील व्याजदर 0.25 टक्क्यांवरून 5.75 टक्के केला आहे.
अलीकडेच एसबीआय, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब आणि सिंध बँक, आयडीबीआय बँक इत्यादींनी देखील आपल्या FD वरील दरांमध्ये वाढ केली आहे. RBI कडून रेपो दरात वाढ झाल्यानंतर बँकाकडून हे दर वाढवण्याची प्रक्रिया सुरू झाली. RBI ने मे आणि जूनमध्ये सलग दोन महिने प्रमुख व्याजदर 0.9 ने वाढवले होते.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.pnbindia.in/Interest-Rates-Deposit.html
हे पण वाचा :
Railway कडून आज 221 गाड्या रद्द, संपूर्ण लिस्ट तपासा
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात नरमाई, आजचे दर पहा
Gold Investment : सोन्यामध्ये अशाप्रकारे गुंतवणूक करून मिळवा भरपूर पैसे !!!
Bollywood : ललित मोदी की सुष्मिता सेन ‘या’ दोघांमध्ये सर्वांत श्रीमंत कोण ???
‘या’ Multibagger Stock ने गुंतवणूकदारांना 1 वर्षात दिले दुप्पट पैसे !!!