नवी दिल्ली । देशात सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. फसवणूक करणारे अनेक नवनवीन मार्गाने लोकांना आपल्या फसवणुकीला बळी पाडत आहेत. अशा प्रकारची फसवणूक टाळण्यासाठी पंजाब नॅशनल बँक लोकांना सतत सावध करत आहे. याच क्रमाने, PNB ने बुधवारी आणखी एक ट्विट जारी करून आपल्या करोडो ग्राहकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
twitter वर PNB Alert
पंजाब नॅशनल बँकेने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर एक मेसेज पोस्ट केला आहे. सण हे साजरे करण्यासाठी असतात, पश्चाताप करण्यासाठी नसतात, असे या मेसेजमध्ये लिहिले आहे. सणासुदीच्या काळात सायबर गुन्हेगार अनेकदा फसवणूक करतात. https://cybercrime.gov.in वर भेट देऊन फसव्या मेसेजच्या अशा घटनांची तक्रार करा.
बँकेशी संबंधित माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्या
PNB च्या म्हणण्यानुसार, ग्राहकांना फसवे मेसेज पाठवले जात आहेत की,’ते फ्री मध्ये कार घेऊ शकतात.’ पंजाब नॅशनल बँकेने आपल्या ग्राहकांना अशा बनावट ईमेल लिंकवर क्लिक करू नये असे सांगितले आहे. PNB ने ग्राहकांना बँकेशी संबंधित माहितीसाठी बँकेच्या अधिकृत वेबसाइट http://www.pnbindia.in ला भेट देण्यास सांगितले आहे. बँकेशी संबंधित सर्व माहिती या वेबसाइटवर मिळेल.
PNB ने बचत खात्यावरील व्याजदर कमी केले आहेत
विशेष म्हणजे, पंजाब नॅशनल बँकेने 1 डिसेंबर 2021 पासून आपल्या बचत खात्यांवरील व्याजदर कमी केला आहे. बँकेने बचत खात्यांवरील व्याजदर 2.80 टक्के कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. पूर्वी व्याजदर 2.90 टक्के वार्षिक होते. यापूर्वी पंजाब नॅशनल बँकेने 1 सप्टेंबर 2021 रोजी बचत खात्यावरील व्याजदरात कपात केली होती.