नवी दिल्ली । कर्जबुडव्या निरव मोदीची ३३० कोटीची संपत्ती सक्तवसुली संचलनालयाने जप्त केली आहे. यामध्ये मुंबई, लंडन आणि संयुक्त अरब अमिरातीमधील आलिशान फ्लॅटचा समावेश आहे. फरार आर्थिक गुन्हेगार कायद्यातंर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. ईडीने यापूर्वी नीरव मोदीची २ हजार ३४८ कोटींची संपत्ती जप्त केली आहे.
मुंबईच्या वरळी भागातील समुद्र महाल येथील फ्लॅट, अलिबागमध्ये समुद्र किनाऱ्यावरील फार्म हाऊस, राजस्थान जैसलमेरमधील मॉल, लंडन-यूएईमधील फ्लॅटस ताज्या कारवाईमध्ये जप्त करण्यात आले आहेत. हिरे व्यापारी नीरव मोदीने पंजाब नॅशनल बँकेकडून (PNB) घेतलेले १४ हजार कोटींचे कर्ज बुडवून लंडनमध्ये पळून गेला आहे.
आठ जूनला मुंबईतील विशेष न्यायालयाने ईडीला संपत्ती जप्त करण्याची परवानगी दिली होती. मागच्यावर्षी 5 डिसेंबरला याच कोर्टाने नीरव मोदीला फरार आर्थिक गुन्हेगार म्हणून घोषित केले होते.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”