Sign in
  • Home
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • आर्थिक
  • शेती
  • खेळ
  • शिक्षण/नोकरी
  • लाईफस्टाईल
  • तंत्रज्ञान
Sign in
Welcome!Log into your account
Forgot your password?
Password recovery
Recover your password
Search
Logo
  • Home
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • आर्थिक
  • शेती
Thursday, March 13, 2025
Facebook
Instagram
Twitter
Vimeo
Youtube
Logo
  • Home
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • आर्थिक
  • शेती
  • खेळ
  • शिक्षण/नोकरी
  • लाईफस्टाईल
  • तंत्रज्ञान
Home आर्थिक PNB ग्राहकांसाठी आनंदाची बातमी !!! आता FD वर मिळणार 8% पेक्षा जास्त...
  • आर्थिक
  • ताज्या बातम्या

PNB ग्राहकांसाठी आनंदाची बातमी !!! आता FD वर मिळणार 8% पेक्षा जास्त व्याज

By
Akshay Patil
-
Tuesday, 21 February 2023, 4:53
PNB
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Share on WhatsApp Share on Facebook Share on X (Twitter) Share on Telegram

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । PNB: महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी गेल्या 9 महिन्यांत RBI ने रेपो दरात वारंवार वाढ केली आहे. ज्यानंतर अनेक सरकारी आणि खाजगी बँकांकडून एफडीवरील व्याजदरात वाढ केली गेली ​​आहे. आता सार्वजनिक क्षेत्रातील Punjab National Bank ने आपल्या 2 कोटींपेक्षा कमीच्या FD वरील व्याजदरात वाढ केली आहे.

Punjab National Bank Q4 net drops 66% to Rs 202 crore | The Financial  Express

20 फेब्रुवारी 2023 पासून नवीन दर लागू

PNB च्या अधिकृत वेबसाइटनुसार, 20 फेब्रुवारी 2023 पासून हे नवीन दर लागू होणार आहेत. पंजाब नॅशनल बँकेने (PNB) निवडक FD च्या व्याजदरात 30 बेस पॉइंट्सपर्यंत वाढ केली आहे. व्याजदर 5 ते 30 बेस पॉइंट्सपर्यंतच्या श्रेणीत वाढले आहेत. या नवीन दरवाढीनंतर, PNB 7 दिवस ते 10 वर्षांच्या कालावधीच्या FD वर 3.5% ते 7.25% पर्यंत व्याजदर देईल.

PNB च्या एफडीचे दर

आता बँकेने 271 दिवस आणि 1 वर्षापेक्षा कमी मुदतीच्या FD वरील नियमित नागरिकांसाठीचा व्याजदर 30 बेस पॉइंट्सने वाढवून 5.50% वरून 5.80% केला आहे. तसेच आता एक वर्ष ते 665 दिवसांच्या FD वरील व्याजदर 6.80% तर 667 दिवस आणि 2 वर्षांच्या FD वरील व्याजदर 6.80% असेल.

Vulnerability in PNB server exposed customers' personal and financial data  for about 7 months: CyberX9 | Business News – India TV

PNB च्या FD चे नवीन दर

7 ते 14 दिवस – 3.50%
15 ते 29 दिवस – 3.50%
30 ते 45 दिवस – 3.5%
46 ते 90 दिवस – 4.50%
91 ते 179 दिवस – 4.50%
180 दिवस ते 270 दिवस – 5.50%
271 दिवस ते 1 वर्षापेक्षा कमी – 5.80%
1 वर्ष – 6.80%
1 वर्षापेक्षा जास्त ते 665 दिवस – 6.80%
666 दिवस – 7.25%
667 दिवस ते 2 वर्षे – 6.80%
2 वर्षांपेक्षा जास्त आणि 3 वर्षांपर्यंत – 7%
3 वर्षांपेक्षा जास्त आणि 5 वर्षांपर्यंत – 6.50%
5 वर्षांपेक्षा जास्त आणि 10 वर्षांपर्यंत – 6.50%

PNB कडून 7 दिवस ते 10 वर्षांपर्यंतच्या डिपॉझिट्सवर ज्येष्ठ नागरिकांना 4% ते 7.75% तर सुपर ज्येष्ठ नागरिकांना 4.3% ते 8.05% पर्यंतचा व्याजदर मिळेल. इथे हे जाणून घ्या कि, सुपर ज्येष्ठ नागरिक म्हणजे 80 वर्षे आणि त्याहून जास्त वयाची लोक.

Fear of lending, few borrowers — why banks are flooding RBI with funds for low returns

रेपो दरात सलग सहाव्यांदा वाढ

8 फेब्रुवारी रोजी RBI ने सलग सहाव्यांदा रेपो दरात वाढ केली. RBI चे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी पतधोरण बैठकीनंतर बोलताना सांगितले की,” जगातील वाढत्या महागाईचा दबाव भारतावरही आहे आणि त्यावर पूर्णपणे मात करण्यासाठी पुन्हा एकदा कर्जाच्या व्याजदरात वाढ करणे आवश्यक झाले आहे. मात्र, यावेळी रेपो दरात केवळ 0.25 टक्के वाढ करण्यात आली आहे.”

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या :  https://punjabandsindbank.co.in/content/interestdom

हे पण वाचा :
Tax Saving Tips : आपल्या गुंतवणुकीचे अशा प्रकारे नियोजन करून वाचवा टॅक्स
Adani Group ला आणखी एक झटका !!! सिटी बँकेनंतर आता ‘या’ बँकेने देखील कर्ज देण्यास नकार
Pre-Approved Loan म्हणजे काय ??? जाणून घ्या ते घेण्याचे फायदे
Earn Money : मोबाईलवरून फोटो काढून कमवता येतील पैसे, जाणून घ्या त्यासाठीची पद्धत
Activa Electric Scooter : आपल्या पेट्रोल अ‍ॅक्टिव्हाला अशा प्रकारे बदला इलेक्ट्रिकमध्ये, त्यासाठी किती खर्च येईल ते पहा

  • TAGS
  • Bank FD
  • FD Rates
  • fixed deposits
  • PNB
  • PNB savings account
  • Punjab National Bank
Previous article‘फँड्री’ तील जब्याची लाडकी शालू झाली आता मोठी; खल्लास डान्स पाहिला का?
Next articleEPFO : EPS पेक्षा जास्त पेन्शन मिळण्याची संधी, शेवटच्या तारखेपूर्वी करा अर्ज
Akshay Patil
Akshay Patil
https://hellomaharashtra.in/

RELATED ARTICLESMORE FROM AUTHOR

results

यंदा दहावी आणि बारावीचा निकाल १५ मेपूर्वी लागणार; शिक्षण मंडळाने दिले संकेत

Economic downturn

Share Market चा बाजार उठणार? 1929 पेक्षाही मोठी घसरण होण्याची भविष्यवाणी

Gold Price Today

Gold Price Today: होळीच्या मुहूर्तावर सोन्याच्या दरात मोठी वाढ; पहा आजचे भाव

  • About Us
  • Privacy Policy
  • Contact Us
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info
  • Grievance Redressal
©
  • Home
  • YouTube
  • Follow
  • WhatsApp