हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंजाब नॅशनल बँक (PNB) ग्राहकांसाठी एक महत्वाची बातमी आली आहे. आता या सरकारी बँकेकडून आपल्या पेमेंटच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले जाणार आहे. हे लक्षात घ्या कि, PNB कडून पॉझिटिव्ह पे सिस्टीम लागू केली जाणार आहे. ज्याअंतर्गत, आता ग्राहकांना कोणत्याही पडताळणीशिवाय चेक पेमेंट करता होणार नाही. या नियमानुसार, जर असे केले गेले नाही तर चेक परत केला जाईल. पुढील महिन्याच्या 5 तारखेपासून चेक पेमेंटचा हा नवीन नियम लागू होणार आहे.
याआधी, याअंतर्गत चेक पेमेंट करण्याची मर्यादा 10 लाख रुपये आणि त्याहून जास्त होती. म्हणजेच आता ग्राहकाने शाखा किंवा डिजिटल चॅनलद्वारे 10 लाख रुपये किंवा त्याहून जास्तीचा चेक जारी केल्यास, त्याला PPS कंफर्मेशन करणे बंधनकारक असेल. आता ग्राहकांना खाते क्रमांक, चेक क्रमांक, चेक अल्फा, चेकची तारीख, चेकची रक्कम आणि लाभार्थ्यांचे नाव द्यावे लागेल. चला तर मग त्याविषयीची माहिती जाणून घेउयात…
पॉझिटिव्ह पे सिस्टीम म्हणजे काय ???
PPS ही नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) द्वारे तयार केलेली एक सिस्टीम आहे, ज्याअंतर्गत ग्राहकांना त्यांच्याद्वारे जारी केलेल्या चेकची माहिती त्यांचे बचत खाते असलेल्या बँकेला द्यावी लागते. चेक क्लिअरन्ससाठी देण्यापूर्वी ही माहिती शेअर करणे बंधनकारक आहे. हे लक्षात घ्या की, ही माहिती अनेक प्रकारे सादर करता येऊ शकते.
PNB चेकसाठी पीपीएस कसा मिळवायचा???
ऑनलाइन बँकिंग, मोबाइल बँकिंग (PNB ONE), ब्रांच ऑफिस किंवा एसएमएस बँकिंगद्वारे चेक डिटेल्स देऊन पॉझिटिव्ह पे सिस्टीम वापरली जाऊ शकते. या संदर्भात, पीएनबीने म्हटले की, चेक सादर करण्याच्या तारखेच्या एक दिवस आधी माहिती द्यावी लागेल.
अशा PPS रोखेल फसवणूक
हे लक्षात घ्या कि, PPS अंतर्गत, चेक जारी करणाऱ्याला चेक बाबतची माहिती मोबाइल एप, नेट बँकिंग, एसएमएस किंवा एटीएमद्वारे बँकेला द्यावी लागेल. यानंतर चेक बँकेमध्ये पोहोचल्यानंतर खातेदाराने दिलेल्या माहितीची पडताळणी केली जाईल. या दरम्यान काही तफावत आढळल्यास चेक नाकारला जाईल. पंजाब नॅशनल बँकेने म्हटले आहे की,” पीपीएस कंफर्मेशन नसल्यास चेक परत केला जाईल.”
PPS अंतर्गत व्हेरिफिकेशनसाठी अशा प्रकारे शेअर करा चेकची माहिती
1. सर्वांत आधी पीएनबी नेट बँकिंगमध्ये लॉग इन करा.
2. व्हॅल्यू एडेड सर्व्हिसेस अंतर्गत ‘पॉझिटिव्ह पे सिस्टम’ टॅबवर क्लिक करा.
3. आता ड्रॉप डाउन मेनूमधून खाते क्रमांक निवडा.
4. यानंतर ग्राहकाला सहा अंकी चेक नंबर क्रमांक, चेक अल्फा (3 कॅरेक्टर), चेकची तारीख, चेकची रक्कम आणि लाभार्थ्यांचे नाव सबमिट करावे लागेल.
5. ट्रान्सझॅक्शनसाठी पासवर्ड एंटर करा आणि सबमिट टॅबवर क्लिक करा.
6. एसएमएसद्वारे तपशील देण्यासाठी खाते क्रमांक, चेक क्रमांक, चेक अल्फा, चेकची रक्कम, चेकची तारीख द्यावी लागेल.
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.pnbindia.in/downloadprocess.aspx?fid=9J+L3eq0tIdOKlV5MndxUw==
हे पण वाचा :
‘या’ Multibagger Stock ने अवघ्या 1 महिन्यात शेअरधारकांचे पैसे केले दुप्पट !!!
Kotak Mahindra Bank च्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी !!! बँकेने FD वरील व्याजदर 50 Bps ने वाढवले
Lunar Eclipse : वर्षातील पहिले चंद्रग्रहण ‘या’ दिवशी होणार, जाणून घ्या त्याविषयीची महत्त्वाची माहिती
आपल्यामागे Satish Kaushik यांनी सोडली कोट्यवधींची संपत्ती, दर महिन्याला कमावायचे इतके पैसे
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात नरमाई, पहा आजचे नवीन भाव