हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । PNB Housing Finance : RBI कडून रेपो दरात वाढ सलग तिसऱ्यांदा वाढ करण्यात आली आहे. यानंतर जवळपास सर्वच बँकांकडूनही आपल्या व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात झाली. मात्र कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याबरोबरच बँकांनी आपल्या डिपॉझिट्सवरील व्याजदरातही वाढ केली आहे. देशातील अनेक बँकांकडून त्यांच्या एफडीच्या दरात वाढ करण्याची घोषणा करण्यात आली आहे. या दरम्यान आता PNB Housing Finance ने देखील FD वरील व्याजदरात बदल केले आहेत.
नवीन दर 10 ऑगस्ट 2022 पासून लागू
PNB Housing Finance ने सांगितले की, आता कंपनी 5 कोटींपेक्षा कमीच्या फिक्स्ड डिपॉझिट्सवर जास्तीत जास्त 7.25 टक्के व्याज देईल. हे नवीन दर 10 ऑगस्ट 2022 पासून लागू झाले आहेत.
असे असतील एफडीचे नवीन दर
या दर वाढीनंतर आता PNB Housing Finance कडून 12 ते 23 महिन्यांच्या कम्युलेटिव्ह एफडीवर 6.50 टक्के व्याज दिले जाईल. तसेच कंपनी 24 ते 35 महिन्यांच्या एफडीवर 6.55 टक्के, 36 ते 47 महिन्यांच्या एफडीवर 7.25 टक्के, 48 ते 59 महिन्यांच्या एफडीवर 7.15 टक्के, 7 ते 71 दिवसांच्या एफडीवर 7.30 टक्के आणि 72 ते 84 महिन्याच्या एफडीवर 7.75 टक्के व्याज मिळेल. त्याच बरोबर कंपनी आता 120 महिन्यांच्या एफडीवर 7.25 टक्के व्याज देईल. 12 ते 120 महिन्यांच्या नॉन-कम्युनिटी एफडीवर 6.1 टक्के ते 7.07 टक्के मासिक व्याज देईल.
इथे हे लक्षात घ्या की, अलीकडेच RBI ने रेपो दर 0.5 टक्क्यांनी वाढवून 5.4 टक्के केला आहे. सध्याचा रेपो दर हा गेल्या 3 वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला आहे. PNB Housing Finance
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.pnbhousing.com/fixed-deposit/interests-rates/
हे पण वाचा :
Indusind Bank ने वाढवले FD वरील व्याजदर, जाणून घ्या किती होणार फायदा !!!
‘या’ Multibagger Stock गेल्या 15 वर्षात गुंतवणूकदारांना बनवले करोडपती !!!
Home Loan : SBI चा ग्राहकांना मोठा धक्का !!! होम लोन 0.50 टक्क्यांनी महागले
Rakesh Jhunjhunwala यांच्या निधनाने आर्थिक जगतात शोककळा !!! अनेक दिग्गजांनी वाहिली श्रद्धांजली