नवी दिल्ली । गेल्या अनेक दिवसांपासून बेपत्ता असलेला भारतातील पंजाब नॅशनल बँक फ्रॉड (PNB Scam) प्रकरणातील मुख्य आरोपी मेहुल चोकसी (Mehul choksi) याला डोमिनिका (Dominica) येथून अटक झाल्यानंतर भारतात आणण्याच्या तयारीला वेग आला आहे. अँटिगा आणि बार्बाडोसचे पंतप्रधान गॅस्टन ब्राउन (Gaston Browne) यांनी म्हटले आहे की,” मेहुल चोकसी यांना येत्या 48 तासात भारतात पाठवले जाऊ शकते. आतापर्यंतच्या वृत्तानुसार, मेहुल चोकसी याला थेट डोमिनिका येथून भारतात आणले जाईल.”
अँटिगा आणि बार्बाडोसचे पंतप्रधान गॅस्टन ब्राउन यांनी शेजारील देश असलेल्या डोमिनिकाला फरार उद्योजक मेहुल चोकसीला थेट भारताकडे देण्यास सांगितले आहे. मंगळवारी रात्री डोमिनिकामध्ये चोक्सीच्या अटकेच्या वृत्तानंतर ब्राउन यांनी स्थानिक माध्यमांना सांगितले की,” त्यांनी डोमिनिकाच्या अधिकाऱ्यांना चोकसीला भारताकडे हस्तांतरित करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत.” अँटिगा न्यूज रूमच्या माध्यम संस्थेने ब्राऊनच्या पत्रकारांशी केलेल्या संभाषणाचा हवाला देत म्हटले आहे की, “आम्ही म्हटले आहे की,”त्यांनी त्याला अँटिगा येथे हस्तांतरित करू नये. त्याला भारतात परत आणण्याची गरज आहे, जिथे त्याला त्याच्याविरूद्ध असलेल्या फौजदारी आरोपांचा सामना करावा लागू शकतो.”
चोकसीला अॅन्टिगा आणि बार्बाडोस सारखे डोमिनिकामध्ये समान हक्क मिळणार नाहीत असे ब्राउन यांनी सूचित केले. 2017 मध्ये नागरिकत्व घेतल्यानंतर, तो 2018 पासून अँटिगा आणि बार्बाडोसमध्ये राहत होता. या बातमीत असे म्हटले गेले आहे की, चोकसीला डोमिनिका मधून थेट भारताकडे सोपविणे सोपे जाईल असा पंतप्रधानांचा विश्वास आहे. नुकताच अँटिगा आणि बार्बाडोस येथून पळून गेलेला चोकसी याला इंटरपोलने त्याच्या विरोधात येलो नोटीस बजावल्यानंतर पकडण्यात आले. बेपत्ता झालेल्या लोकांचा शोध घेण्यासाठी इंटरपोल यलो नोटीस बजावतो.
पंजाब नॅशनल बँकेच्या 13,500 कोटी रुपयांच्या कर्ज फसवणूकीच्या प्रकरणात चोकसी वॉन्टेड आहे. रविवारी चौक्सी याला अँटिगा आणि बार्बाडोस येथे त्याच्या कारमध्ये डिनरसाठी जाताना पाहिले होते. चोक्सीची कार मिळाल्यानंतर त्याच्या कर्मचार्यांनी तो बेपत्ता असल्याचे सांगितले. रविवारीपासून चोक्सी बेपत्ता असल्याची पुष्टी त्याचे वकील विजय अग्रवाल यांनी केली होती. चोकसी बेपत्ता झाल्याच्या बातमीने कॅरिबियन बेटांच्या देशात खळबळ उडाली होती. अँटिगा आणि बार्बाडोसच्या संसदेत विरोधकांनी हा मुद्दा उपस्थित केला.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा