PNB च्या ‘या’ स्पेशल FD स्कीमवर मिळणार 7.85% पर्यंतचा व्याजदर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । PNB : सरकारी बँक असलेल्या पंजाब नॅशनल बँकेकडून 600 दिवसांच्या कालावधीसाठी स्पेशल FD योजना सुरू करण्यात आली आहे. ही योजना 2 कोटी रुपयांपर्यंतच्या एफडीसाठी व्हॅलिड असेल. याअंतर्गत ज्येष्ठ नागरिक आणि अति ज्येष्ठ नागरिकांना 7.85 टक्के व्याजदर देण्यात येतो आहेत.

याबाबत माहिती देताना पंजाब नॅशनल बँकेचे एमडी आणि सीईओ अतुल कुमार गोयल यांनी सांगितले कि, “आमचा उद्देश आमच्या ग्राहकांना सर्वोत्तम ऑफर्स देणे हा आहे. अशा जास्त एफडी दरांमुळे बँकेकडून ग्राहकांना एक चांगला पर्याय दिला जातो आहे. जेणेकरून ग्राहकांना त्यांच्या बचतीवर जास्तीत जास्त कमाई करता येईल.

Customers will get 7.85% interest rate on FD with PNB, know who can avail the benefits

PNB ची स्पेशल FD स्कीमबाबत जाणून घ्या

PNB च्या स्पेशल FD योजनेंतर्गत, 60 वर्षे आणि त्यावरील लोकांसाठी (ज्येष्ठ नागरिक) आणि 80 वर्षे किंवा त्याहून जास्त वयाच्या लोकांसाठी (सुपर ज्येष्ठ नागरिक) 2 कोटी रुपयांपर्यंतच्या FD वर स्पेशल व्याजदर ऑफर केला जात आहेत. 600 दिवसांच्या FD सह ही योजना कॉलेबल आणि नॉन-कॉलेबल ऑप्शन सहीत येते. बँकेचे सध्याचे ग्राहक पीएनबी वन ऍप आणि इंटरनेट बँकिंगद्वारे या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

PNB Offers Extra 0.80% FD Interest Rate for These Senior Citizens; Know Details

इतके व्याज मिळेल

11 ऑक्टोबरपासून PNB चे स्पेशल FD दर लागू झाले आहेत. या योजनेअंतर्गत, PNB कॉलेबल ऑप्शनमध्ये ज्येष्ठ नागरिकांना 7.50 टक्के आणि सुपर ज्येष्ठ नागरिकांना 7.80 टक्के व्याज देत आहे. नॉन-कॉलेबल ऑप्शनमध्ये, सामान्य नागरिकांना 7.05 टक्के दराने व्याज मिळेल. तसेच दुसरीकडे ज्येष्ठ नागरिकांना 7.55 टक्के तर सुपर ज्येष्ठ नागरिकांना 7.85 टक्के व्याज मिळणार आहे. स्पेशल एफडीवर सर्वाधिक व्याज 7.85 टक्के दराने मिळत आहे.

अब ये सरकारी बैंक FD पर दे रहा है 7.85% का ब्याज, आपके लिए मोटी कमाई का मौका - PNB Punjab national bank launches special 600 days FD fixed deposit scheme offering

सामान्य एफडीचे व्याजदर

PNB 7 दिवसांपासून ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी FD योजना ऑफर करते. या अंतर्गत 3.50 ते 7.50 टक्के व्याज दिले जाते. FD वरील व्याजदर सामान्य नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि सुपर ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगवेगळे आहेत.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.pnbindia.in/fixeddeposit.html

हे पण वाचा :
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये गुंतवणूक करून मिळवा दुप्पट रिटर्न
RBI कडून ‘या’ बँकेचे लायसन्स रद्द, आता डिपॉझिटर्सच्या पैशांचे काय होणार ते जाणून घ्या
Bank Of Baroda मधून MCLR मध्ये वाढ, आता लोनसाठी द्यावे लागणार जास्त व्याज
Stock Tips : ‘या’ 5 शेअर्सनी गेल्या 6 महिन्यांत दिला 40% पेक्षा जास्त रिटर्न !!! त्याविषयी जाणून घ्या
Realme 5G speed edition स्वस्तात खरेदी करण्याची संधी !!! कसे ते जाणून घ्या