नवी दिल्ली । यावेळी पंजाब नॅशनल बँक आपल्या मुलांसाठी एक खास सुविधा घेऊन आली आहे. या सुविधेमध्ये बँक मुलांसाठी एक खास खाते घेऊन आली आहे, ज्याद्वारे आपण आपल्या मुलांचे भविष्य घडवू शकता. या खात्याचे नाव पीएनबी ज्युनिअर एसएफ अकाउंट (PNB Junior SF Account) आहे. विशेष बचतीसाठी मुलांना बचतीची सवय व्हावी म्हणून बॅंकेने हे बचत फंड खाते खास मुलांसाठी आणले आहे.
अल्पवयीन म्हणजेच वय 10 वर्षांपेक्षा जास्त असल्यास ते स्वत: च्या नावे देखील हे खाते उघडू शकतात. हे खाते उघडण्यासाठी KYC आवश्यक आहे. यामध्ये फोटोबरोबरच ओळखपत्र आणि एड्रेस प्रूफही आवश्यक आहे. या खात्यावर बँक आपल्या मुलांना अनेक खास सुविधा देत आहे. आपण त्यांच्याबद्दल तपशीलवार जाणून घेउयात-
पीएनबी ज्युनिअर एसएफ खात्याची वैशिष्ट्ये-
>> हे खाते अल्पवयीन मुलांसाठी उघडले जाईल.
>> हे खाते मुलांच्या कायदेशीर आणि नैसर्गिक पालकांद्वारे उघडता येऊ शकते.
>> या व्यतिरिक्त, 10 वर्षांवरील मुले स्वतःच हे खाते उघडू आणि ऑपरेट करू शकतात.
>> आपल्याला या खात्यासाठी किमान शिल्लक लागत नाही.
>> या खात्यात इनिशियल डिपॉझिट शून्य आहे.
Open a Junior Saving Fund account for your champ and get a secured future in return.
Know more: https://t.co/WFcuHsGZeY#JuniorSavingFund pic.twitter.com/psF57X3YTm
— Punjab National Bank (@pnbindia) July 10, 2021
पीएनबीने ट्विट केले
पीएनबीने ट्विटद्वारे या खात्याबद्दल माहिती दिली आहे. बँकेने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर लिहिले आहे की,” पीएनबी ज्युनिअर एसएफ खात्याद्वारे मुलांना लवकर बचत करण्याची सवय लावायला हवी! पीएनबी ज्युनिअर एसएफ खात्याद्वारे आपण आपल्या मुलांना सुरक्षित भविष्य देऊ शकता.”
फ्री मध्ये NEFT
या खात्यात Minimum Quarterly Average Balance (QAB) झिरो आहे. याशिवाय या खात्यात बँक मुलांना 50 पानांचे चेकबुक देते. हे एका वर्षासाठी असते. याखेरीज या खात्याद्वारे NEFT ट्रान्सझॅक्शन केल्यास आपण दररोज दहा हजार रुपयांपर्यंतचे फ्री ट्रान्सझॅक्शन करू शकता.
Rupay ATM Card मिळवा
याशिवाय शाळा आणि महाविद्यालयांसाठी डिमांड ड्राफ्ट फ्री आहे. Rupay ATM Card वर ग्राहकांना दररोज 5 हजार रुपये काढण्याची सुविधा मिळते.
या लिंकवरुन खात्याची माहिती मिळवा
या व्यतिरिक्त या खात्याबद्दलच्या अधिक माहितीसाठी तुम्ही https://www.pnbindia.in/pnb-junior-sf-account.html या लिंकला भेट देऊ शकता. येथे आपल्याला खात्याशी संबंधित संपूर्ण माहिती मिळेल.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा