हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात नुकताच Poco C55 हा नवीन स्मार्टफोन लॉन्च करण्यात आला आहे. Poco या कंपनीच्या C-Series मधील हा नवीन स्मार्टफोन आहे. यामध्ये 50MP ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आणि MediaTek Helio G85 प्रोसेसर दिला गेला आहे.
भारतात Poco C55 च्या 6GB + 128GB व्हेरिएंटची किंमत 10,999 रुपये तर 4GB + 64GB व्हेरिएंटची किंमत 9,499 रुपये आहे. ग्राहकांसाठी हा स्मार्टफोन फॉरेस्ट ग्रीन, पॉवर ब्लॅक आणि कूल ब्लू या कलरमध्ये उपलब्ध असेल. तसेच हा फोन 28 फेब्रुवारीपासून कंपनीची वेबसाइट आणि फ्लिपकार्टवरून खरेदी करता येऊ शकेल.
Poco C55 सेलच्या पहिल्या दिवशी हा फोन स्पेशल प्राइसमध्ये ऑफर केला जाणार असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे. यावेळी ग्राहकांना 4GB + 64GB व्हेरिएंट 8,499 रुपयांमध्ये तर 6GB + 128GB व्हेरिएंट 9,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. यामध्ये HDFC बँक, SBI बँक आणि ICICI बँकेच्या ग्राहकांसाठीच्या ऑफरचा देखील समावेष असेल.
Poco C55 च्या फीचर्स बाबत बोलायचे झाल्यास हा स्मार्टफोन MIUI 13 वर चालेल. यामध्ये 6GB रॅम आणि MediaTek Helio G85 प्रोसेसर दिला गेला आहे. त्याची इंटर्नल मेमरी 64GB आहे. तसेच कार्डच्या मदतीने 1TB पर्यंत वाढवता देखील येईल.
Poco C55 मध्ये 10W चार्जिंग सपोर्टसहीत 5,000mAh बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन डस्ट आणि वॉटर रेझिस्टन्ससाठी IP52 रेटेड आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये Wi-Fi, 4G, ब्लूटूथ 5.1, GPS आणि मायक्रो-USB सपोर्ट आहे. सिक्योरिटीसाठी यामध्ये रिअर माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.
या स्मार्टफोनमध्ये 120Hz टच सॅम्पलिंग रेट आणि 60Hz रिफ्रेश रेटसहीत 6.71-इंचाचा HD+ (720×1,650 पिक्सेल) LCD डिस्प्ले दिला गेला आहे. कॅमेऱ्याबाबत बोलायचे झाल्यास, त्याच्या मागील बाजूस 50MP प्रायमरी कॅमेरा आणि एक सेकेंडरी कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच सेल्फीसाठी या फोनच्या समोरील बाजूस 5MP कॅमेराही उपलब्ध आहे.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.poco.in/poco-c55
हे पण वाचा :
EPFO : EPS पेक्षा जास्त पेन्शन मिळण्याची संधी, शेवटच्या तारखेपूर्वी करा अर्ज
PNB ग्राहकांसाठी आनंदाची बातमी !!! आता FD वर मिळणार 8% पेक्षा जास्त व्याज
Credit Score म्हणजे काय ??? त्याचे महत्त्व जाणून घ्या
‘या’ 5 कारणांमुळे आपण येऊ शकाल Income Tax डिपार्टमेंटच्या रडारवर, जाणून घ्या त्याविषयीची माहिती
Punjab and Sind Bank च्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी, आता FD वर मिळणार 8% पेक्षा जास्त व्याज