हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध मोबाईल ब्रँड POCO ने बाजारात स्वस्तात मस्त आणि ग्राहकांना परवडणारा स्मार्टफोन लाँच केला आहे. POCO C61 असे या नव्या मोबाईलचे नाव असून कंपनीने हा स्मार्टफोन २ स्टोरेज व्हेरियेण्ट मध्ये लाँच केला आहे. अतिशय दमदार असा प्रोसेसर, आकर्षक कॅमेरा क्वालिटी असलेल्या या मोबाईलची सुरुवातीची किंमत अवघ्या 7,499 रुपयांपासून सुरु होतो. आज आपण या स्मार्टफोनबाबत सर्व काही सविस्तरपणे जाणून घेऊयात..
6.7 इंचाचा डिस्प्ले –
POCO C61 मध्ये 90Hz च्या रिफ्रेश रेटसह 6.7 इंचाचा LCD स्क्रीन आहे. या डिस्प्लेच्या वरच्या बाजूला एक नॉच देखील आहे, ज्यामध्ये सेल्फी कॅमेरा बसवला आहे. हा डिस्प्ले 500 निट्स पीक ब्राइटनेस आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 च्या प्रोटेक्शन सह देण्यात आला आहे. कंपनीने या स्मार्टफोनमध्ये MediaTek Helio G36 प्रोसेसर दिला असून Android 14 OS या ऑपरेटिंग सिस्टीम सह लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये ड्युअल सिम 4G, Wi-Fi 5 802.11 a/b/g/n/ac, ब्लूटूथ 5.4, GPS, GLONASS, Galileo आणि BeiDou सारखी अनेक विशेष वैशिष्ट्ये आहेत.
कॅमेरा – POCO C61
मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झालयास, POCO C61 मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. यामध्ये प्राथमिक कॅमेरा 8MP आहे, जो f/2.0 अपर्चरसह येतो. तर सेकंडरी कॅमेरा AI सपोर्टेड आहे, जो LED फ्लॅश लाईटसह येते. याशिवाय समोरील बाजूला विडिओ कॉल आणि सेल्फीसाठी 5MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. पॉवरसाठी मोबाईल मध्ये 5000mAh बॅटरी दिली असून हि बॅटरी 10W फास्ट चार्जरला सपोर्ट करेल.
किंमत किती?
POCO C61 ची किंमत अगदी सर्वसामान्य ग्राहकांना परवडणाऱ्यासारखी आहे. या स्मार्टफोनच्या 4GB+64GB मॉडेलची किंमत 7499 रुपये आहे तर 6GB+128GB इंटर्नल स्टोरेज असलेल्या व्हेरिएन्टची किंमत 8499 रुपये आहे. हा हँडसेट 28 मार्चपासून फ्लिपकार्टवर उपलब्ध होईल. ग्राहक हा मोबाईल डायमंड डस्ट ब्लॅक, इथरियल ब्लू आणि मिस्टिकल ग्रीन कलरमध्ये खरेदी करू शकतात.