हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागील अनेक वर्षांपासून पीओके म्हणजेच पाकव्याप्त काश्मीरचा प्रश्न सुटलेला नाही. परंतु याच संदर्भांत आज लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी एक सूचक विधान केले आहे. पाकव्याप्त काश्मीरवर कारवाई करण्यासाठी भारतीय लष्कर पूर्णपणे तयार आहे. भारत सरकारने आम्हाला जर आदेश दिला तर कोणत्याही कारवाईसाठी भारतीय लष्कर सज्ज आहे असं त्यांनी म्हंटल आहे. त्यामुळे पाकव्याप्त काश्मीर भारतात आणण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत का? असा प्रश्न निर्माण झालाय.
उपेंद्र द्विवेदी म्हणाले की, दहशतवादी त्यांच्या मनसुब्यांमध्ये कधीही यशस्वी होणार नाहीत. पीओकेच्या विषयावर संसदेत ठराव मंजूर करण्यात आला आहे. यात नवीन काहीच नाही. तो संसदेच्या ठरावाचा भाग आहे. सरकारच्या प्रत्येक आदेशासाठी भारतीय लष्कर पूर्णपणे सज्ज आहे. जेव्हा सरकार आदेश देईल तेव्हा लष्कर पूर्ण तयारीनिशी पुढे जाईल असेही त्यांनी म्हंटल.
पाकव्याप्त काश्मीर हा भारताच्या उत्तरेकडचा भाग गिलगिट बाल्टिस्तान होय. स्वातंत्र्यानंतर याच प्रदेशावर पाकिस्तानी लष्कर आणि घुसखोरांनी ताबा मिळवला आणि तेव्हापासून हा भाग पाकिस्तानकडे आहे. पीओकेसाठी मागील कित्येक वर्षांपासून भारताचे प्रयत्न सुरु आहेत. परंतु इथे आता लष्करी कारवाई होण्याचे संकेत दिसून येत आहेत. २०२४ पर्यंत पाकव्याप्त काश्मीर भारतात येण्याची शक्यता आहे असे विधान यापूर्वीच केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी सुद्धा केलं होत, त्यामुळे खरंच पाकव्याप्त काश्मीर भारतात येतो का हे पाहावं लागेल.