Sunday, May 28, 2023

पोलिसांची कारवाई : चारचाकी व 1 हजार विदेशी दारूच्या बाटल्यासह 1 लाख 26 हजारांचा मुद्देमाल जप्त

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा तालुक्यातील बोरगाव पोलिसांनी वर्णे गावच्या हद्दीत अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले आहे.  दारूची वाहतूक करणाऱ्यांकडून 90 मिलीच्या 1 हजार विदेशी दारूच्या बाटल्या आणि चारचाकी असा मिळून 1 लाख 26 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

वर्णे पोलिस स्टेशनपासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या अपशिंगे येथील दोघांना बोरगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दारू प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ.सागर वाघ यांनी दिली आहे.

खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी टीमसोबत ही कारवाई केली. या कारवाईमुळे दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले असून यापुढेही अशा कारवाई सुरू राहणार असल्याचे डाॅ. सागर वाघ यांनी सांगितले.