औरंगाबाद | दहशत निर्माण करण्यासाठी शेजारच्याची बंदूक हातात घेऊन घरातून बाहेर येत असल्याची व्हिडीओ क्लिप समाज माध्यमवर प्रसारित करणार्यां दोन जणांना चांगलेच महागात पडले. गुन्हे शाखेने बंदुकीच्या परवानाधारक असलेल्या माजी सैनिकांसह त्या तरूणावर गुरुवारी कारवाई केली. गौतम बाबासाहेब बनकर राहणार मिसळवाडी आणि शास्त्र परवानाधारक आणि राजू शंकर खरात अशी आरोपींची नावे आहे.
पोलिसांनी सांगितले की आरोपी खरात हे माजी सैनिक असून ते जुना मोंढ्यातील अजिंठा बँकेचे सुरक्षा रक्षक म्हणून नोकरीला आहे. त्यांच्याकडे परवाना असलेली बाराबोर ची बंदूक आहे. दोघेही शेजारी राहतात बनकर हा खरात यांच्या मुलाचा मित्र असल्यामुळे त्याने त्यांच्या घरी येणे-जाणे आहे.
फेब्रुवारीत खरात यांनी बंदूक साफसफाई करण्यासाठी घरी नेऊन ठेवली होती. तेव्हा बनकरची नजर चुकून बंदूकवर पडली त्याने बंदूक घेतली आणि मोबाईलवर एक व्हिडीओ क्लिप बनवली. त्यात तो सिनेस्टाईल एका घरातून बाहेर येतो आणि बंदूक दाखवून एका ओट्यावर बसतो.
काही दिवसापूर्वी घटना या घटनेची व्हिडीओ क्लिप त्यांनी बनवली आणि काही दिवसांनी वरती व्हाट्सअपवर व्हायरल केली. याविषयी गुन्हे शाखेला माहिती मिळताच सहायक फौजदार विठ्ठल जामखेड, शेख हबीब यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत. मिसरवाडी येथे जाऊन त्याला ताब्यात घेतले.
शस्त्र परवानाचे उल्लंघन करणे आणि कोणतेही प्रशिक्षण नसताना बंदुक हाताळणे या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.