सातारा प्रतिनिधी । खटाव तालुक्यातील एनकुळ येथे बेकायदेशीर देशी-विदेशी दारू विक्री सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. नामदेव खरमाटे या इसमाकडून गेली अनेक महिने हा व्यवसाय सुरु होता. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी धड टाकली असता त्यांना मिळालेल्या माहितीत तथ्य आढळून आलं. पंचक्रोशीतील गावांना छुप्या पद्धतीनं दारू पुरवठा करण्याचं काम खरमाटे करत होता. नामदेव बाबा खरमाटे यांच्यावर वडुज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी मारलेल्या छाप्यात देशी विदेशी असा एकूण ४ लाख ६५ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
शरद पवार यांनी खासदार म्हणून एनकूल हे गाव दत्तक घेतलेलं आहे. गावामध्ये विकासात्मक कामे मोठ्या प्रमाणावर केली जात असताना विनापरवाना केल्या जात असलेल्या दारूविक्रीमुळे परिसरातील लोकही त्रस्त झाले होते. पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईमुळे आजूबाजूच्या परिसरातील अशा धंद्यांना छाप बसेल असा विश्वास लोकांनी व्यक्त केला आहे.