हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख ( Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. पोलिसांनी फरार असलेल्या तीन पैकी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे असे या आरोपींची नावे असून त्यांना पोलिसांनी पुण्यात अटक केले आहे. परंतु यातील तिसरा आरोपी म्हणजेच कृष्णा आंधळे हा अजूनही फरार आहे. त्याचा शोध पोलीस घेत आहेत.
महत्त्वाचे म्हणजे संतोष देशमुख यांच्या लोकेशनची टीप देणाऱ्या सिद्धार्थ सोनावणेला पोलिसांनी मुंबई अटक केली आहे. यासह आरोपींना पळून जाण्यास मदत करणाऱ्या डॉ. संभाजी वायबसे याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपींना पळून जाण्यास मदत करण्यामध्ये डॉ संभाजी वायबसे याचा मोठा हात होता. वायबसे याची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी इतर आरोपीला अटक केली आहे.
दरम्यान, संतोष देशमुख यांच्या हस्तेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उडली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड हा पोलिसांना शरण आला. परंतु या प्रकरणातील इतर आरोपी फरार होते. यातील दोन मुख्य आरोपींना आणि त्यांना मदत करणाऱ्या व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच, इतर आरोपींना पोलीस शोधत आहेत. त्यामुळे सर्वांच्या नजरा या प्रकरणाकडे लागून राहिल्या आहेत.