नागरिकत्व विधेयका विरोधातील आंदोलनाला हिंसक वळण; जामिया मिलिया विद्यापीठात पोलिसांचा विद्यार्थ्यांवर लाठीमार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली प्रतिनिधी । नागरिकत्व कायदा दुरूस्ती विधेयक मंजूर झाल्यानंतर लागू केल्यानंतर आसाम, मिझोराम, त्रिपुरा, सिक्कीमसह सात राज्यात प्रचंड तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. ठिकठिकाणी नागरिक रस्त्यावर उतरले असून या कायद्याची अंमलबजावणी झाल्यानंतर हिंसाचार उफाळून आला आहे.

आतापर्यंत पोलिसांच्या गोळीबारात पाच जण मरण पावले असून हिंसाचाराच्या घटना सुरूच आहेत. दिल्लीच्या प्रसिद्ध जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी या कायद्याविरोधात आंदोलनाची हाक दिली होती. मात्र विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. आंदोलन करत असलेल्या विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये वाद झाला.

त्यातून सतंप्त विद्यार्थ्यांनी दिल्ली परिवहन महामंडळाच्या तीन बस पेटवून दिल्या. यात अग्निशमन दलाचे काही कर्मचारीही जखमी झाले आहेत. या घटनेनंतर दिल्ली पोलिसांनी जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात जाऊन विद्यार्थ्यांवर लाठीमार केला. या पोलीस कारवाईचा विद्यापीठाच्या  कुलगुरू नजमा अख्तर यांनी निषेध केला आहे.

Leave a Comment