यात्रेत हरवलेल्या बालकाला पोलीसांनी शोधलं; माय-लेकराची करून दिली भेट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अमरावती प्रतिनिधी । आशिष गवई
अमरावती जिल्हातील बहीरम येथे दरवर्षी भव्य यात्रेचं आयोजन करण्यात येतं. महाराष्ट्रभर नावलौकीक असणार्‍या बहीरम यात्रेवर येथिल पोलीसांची बारीक नजर असून मंगळवारी येथे एका हरवलेल्या बालकाला पोलीसांनी शिताफीने शोधून त्याच्या आई-वडिलांच्या स्वाधिन केले. यात्रेमधे येणार्‍या यात्रेकरूंनी स्वतःच्या मुलांकडे नेहमी लक्ष ठेवण्याची विनंतीही यावेळी पोलीस प्रशासनाने केली. खरेदी करण्यात मग्न असलेल्या पालकांकडून लहान बालकांकडे दुर्लक्ष केले जाते आणि याचा परिणाम म्हणून मुले हरवतात. मुलं हरवणार नाहीत याची दक्षता पालकांनी घ्यायला हवी असा सल्ला पोलीसांनी यावेळी दिला आहे.

बहिरमच्या यात्रेकरीता दुरवरून यात्रेकरू हजारोंच्या संख्येने येत असतात. कोणता व्यक्ती कसा आहे? तो कशाकरीता येथे आलेला आहे. हे सांगता येत नाही. अशातच लहान बालकांना संधी साधून पळवून नेणारे सुद्धा असू शकतात. त्यामूळे लहान मुले, मुली, तरुण आणि वृद्ध यांच्या वर नेहमी लक्ष ठेवल्यास कोणतीही अनुचित घटना टाळता येऊ शकते. आमची संपुर्ण परीसरावर बारीक नजर असून कोणताही अपप्रकार आम्ही यात्रेदरम्यान सहन करणार नाही असेही पोलीसांनी सांगितले. हरविलेल्या मुलाला शोधण्यात कॉन्स्टेबल अक्षय रेवाळकर, हेड काॅन्टेबल पटवर्धन, एल पि सी वंदना तायडे, यांचा मोलाचा वाटा होता.

Leave a Comment