किरकोळ वादामुळे पोलिसांना सापडला अट्टल दुचाकीचोर; पाच दुचाकी हस्तगत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | गाडीचा धक्का लागला म्हणून दोघांशी वाद घालत असताना एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र पोलिसी खाक्या दाखवताच तो अट्टल दुचाकीचोर असल्याचे समोर आले.त्याच्या ताब्यातून पोलिसांनी पाच चोरीच्या दुचाकी जप्त केल्या.ही घटना वाळूज एमआयडीसी भागात घडली.आरोपी कडून बरेच गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.अंबर विठ्ठल देवकर वय-21 (रा.फरशी फाटा, ता.फुलंब्री) असे आरोपीचे नाव आहे.

शुक्रवारी रात्री पोलीस गस्तीवर असताना अंबर हा स्टारलाईट कंपनी समोर दोघांशी वाद घालत होता.पोलीस तेथे पोहोचताच इतर दोघे पळाले मात्र पोलिसांनी अंबरला ताब्यात घेतले. त्या जवळील (एम.एच.20, डीएम 7252) या दुचाकी बाबत माहिती घेतली असता, ती दुचाकी चोरीची असल्याचे कळाले.

त्याला अधिक विचारपूस केली असता त्याने अजून चार दुचाकी परिसरातून चोरी केल्याची कबुली दिली.पोलिसांनी त्याच्या कडून एकूण पाच दुचाकी जप्त केल्या आहेत.त्याच्यावर याअगोदर देखील नऊ गुन्हे दाखल असून अजून बरेच गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांनी व्यक्त केली आहे.या प्रकरणी अधिक तपास एमआयडीसी वाळूज पोलीस करीत आहेत.

Leave a Comment