‘त्या’ जिवलग मित्रांना आत्महत्येला प्रवृत्त करणाऱ्या तिघांना पोलिसांनी केली अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | पिंप्री येथील दोन मित्रानी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी घडली होती. आईवडिलांचा अपमान सहन होणार नाही’ असं म्हणत त्यांनी व्हाट्सअप स्टेटस सुसाईड नोट म्हणून ठेवत आत्महत्या केली होती.

माहिती सहायक पोलिस निरीक्षक प्रल्हाद मुंढे यांनी दिलेल्या माहितीनुसार सिल्लोड तालुक्यातील पिंप्री (वरुड) येथील दोन तरुणांच्या आत्महत्ये प्रकरणी सुसाईड नोट मध्ये लिहिलेल्या आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर तिन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली. त्यांना बुधवारी न्यायालयात उभे केले असता, सिल्लोड न्यायालयाने एक दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे.योगेश सुधाकर खिस्ते (23) आणि ज्ञानेश्वर गणेश शिरसाट (20) असे मृतांची नावे आहेत. त्यांनी स्टेटसला ठेवलेल्या सुसाईड नोटवरून शेख मोईन, शेख मुश्ताक आणि एक महिला यांना ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले.

या प्रकरणी मयत योगेशचा भाऊ सुरेश खिस्ते यांनी दिलेल्या माहिती वरून, शेख मोईन महंमद सुभान (58 रा. आझाद चौक गॅस गोडाऊनजवळ सिल्लोड), मुश्ताक गफुरखाँ पठाण (52 रा. कठोराबाजार ता. भोकरदन, ह. मु. बापुनगर, सिल्लोड) आणि एका 38 वर्षीय महिला (रा. सिल्लोड) अशा तिघांविरोधात सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला.पोलिसांनी शेख मोईन व मुस्ताक पठाण यांना मंगळवारीच अटक केली, तर महिला आरोपीला बुधवारी अटक केली. या तिघांना एक दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. या घटनेचा आधिक तपास पोलिस करीत असून त्यांच्या आत्महत्येच्या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Comment