शहरात बाजारपेठा खुल्या करा; व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांची मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | कोरोना महामारीत सुरुवातीसारख्या बाजारपेठ सुरु ठेवण्यात आल्या तर वाहतूक कोंडीचा प्रश्न मिटेल असा विश्वास जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांनी दिला आहे.

सोमवारी जालना रोडसह क्रांतिचौक, गोपालटी तसेच बाजारपेठ असलेल्या ठिकाणी वाहनांची भरपूर प्रमाणात गर्दी बघायला मिळाली होती. यामुळे 20 ते 30 मिनिटे वाहनाना ट्रॅफिक मध्ये थांबावे लागत होते. बाजारपेठ अधिक काळ सुरू राहिल्यास ग्राहकांना खरेदीसाठी अधिक वेळ मिळेल, एकाच वेळी होणारी गर्दी टाळता येईल. त्यातून वाहतूक कोंडीचा प्रश्न काही प्रमाणात कमी होण्यास मदत होईल, असं जगन्नाथ काळे म्हणाले.

शहरात कोरोनाचे रुग्ण कमी होत असल्यामुळे शासनाने कोरोनाचे नियम शिथिल केले होते. परंतु डेल्टा प्लस चा धोका लक्षात घेऊन पुन्हा निर्बंध लावण्यात आले होते. या निर्बंधामुळे अत्यावश्यक वस्तू आणि सेवा आणि दुकाने सकाळी सात ते दुपारी चारपर्यंत खुली ठेवावीत आणि शनिवार रविवार दुकाने बंद ठेवावी असे आदेश देण्यात आले.

परंतु बाजारपेठेत साडेअकरा, बारा वाजेनंतर ग्राहक खरेदीसाठी येतात. एकाच वेळी गर्दी होते, त्यात तीन वाजेपासूनच हिशोब पूर्ण करणे व अन्य आवराआवर करण्यासाठी व्यापाऱ्यांची लगबग सुरू होते आणि चार वाजता दुकानाचे शटर खाली येते. या सर्व घडामोडीत बाजारपेठेत एकाच वेळी गर्दी होत आहे. त्यातूनच गेल्या काही दिवसांपासून वाहतूक कोंडीचा प्रश्न अधिक गंभीर झाल्याचे दिसते, असे महासंघाचे अध्यक्ष काळे यांनी नमूद केले.

Leave a Comment