औरंगाबाद: बाहेरगावाहून रेल्वेच्या परीक्षेसाठी आलेली तरुणी औरंगाबादेत उतरताच लॉकडाऊनमुळे गांगरून गेली. गाड्या उपलब्ध नसल्याने अखेर येथील बंदोबस्तावर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी या तरुणीला स्वतःच्या गाडीवर परीक्षा स्थळी नेऊन पोहोचवले. पोलीसांच्या मदतीमुळे ती परीक्षा देऊ शकली बंदोबस्त सोबतच सामाजिक कामात पोलिसांची तत्परता पाहून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख व खासदार सुप्रिया सुळे यांनी याची दखल घेत त्या पोलिसाचे कौतुक केले.
बुलढाणा येथील एक तरुणी शहरात रेल्वे बोर्डाची परीक्षा देण्यासाठी आली होती तिचे पीईएस अभियांत्रिकी महाविद्यालयात सेंटर आले होते. तेथे जाण्यासाठी तिने अनेक रिक्षा चालकांना थांबण्याचा इशारा केला परंतु एकही रिक्षावाला थांबत नसल्याने ती घाबरली. दुपारचे एक वाजता आले आणि पेपर दीड वाजता सुरू होणार होता.
महाराष्ट्र पोलीस सदैव जनतेच्या सेवेसाठी तत्पर असतात,याचे उदाहरण औरंगाबाद येथील पोलीस कर्मचारी हनुमंत चाळनेवाड यांनी दाखवून दिले. एका परीक्षार्थीला वेळेत परीक्षा केंद्रावर सोडण्याचे काम त्यांनी केले.त्यांचे हे काम कौतुकास्पद आहे. https://t.co/lXtlRM3vsj
— Supriya Sule (@supriya_sule) March 14, 2021
शेवटी तिने बंदोबस्तावरील पोलिसाकडे मदत मागितली त्या तरुणीची अडचण लक्षात घेऊन क्रांतीचौक पोलिस ठाण्याचे शिपाई हनुमंत चाळणेवाड यांनी त्यांच्या दुचाकीवरून त्या तरुणीस परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचवले.या घटनेची माहिती मिळताच राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख व राष्ट्रवादीच्या नेत्या खा.सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत या पोलिसाचे तोंड भरुन कौतुक केले.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा