पुणे : पुण्यातील ओशो आश्रम प्रशासन आणि अनुयायांमधील वाद विकोपाला गेला आहे. ओशो आश्रम व्यवस्थापनाच्या विरोधाला झुगारून लावत आश्रमात प्रवेश केलेल्या ओशो अनुयायांवर पोलिसांनी लाठीमार करत त्यांना ताब्यात घेतले. या लाठीमारात अनेक अनुयायी गंभीर जखमी झाले आहेत. काल ओशो आश्रमात अनुयायांना संन्याशी माळा घालून जाण्याची मुभा क्षणिक ठरली.
आज पुन्हा संन्याशी माळा घालून प्रवेशास बंदी केल्यानंतर 150 ते 200 ओशो अनुयायायांनी व्यवस्थापनाला न जुमानता गेट उघडून आश्रमात प्रवेश केला. काहीही झाले, तरी आश्रमात प्रवेश शुल्क न भरता संन्याशी माला घालून जाण्याचा निर्धार ओशो अनुयायांनी केला. यावेळी आश्रमाच्या आतमध्ये जाऊन व्यवस्थापनाचा निषेध करणाऱ्या अनुयायांनी बाहेर काढण्यासाठी पोलिसांची मोठी फौज दाखल झाली. पोलिसांनी वारंवार समजावून सांगूनही अनुयायी आपल्या मागण्यांवर ठाम होते.
Osho अनुयायांवर पोलिसांचा लाठीचार्ज pic.twitter.com/CznjkTJ3jg
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) March 22, 2023
त्यानंतर ओशो आश्रमाच्या बचावासाठी व्यवस्थापन विरोधात जोरदार घोषणाबाजी करणाऱ्या अनुयायांवर पोलिसांनी लाठीमार करत ताब्यात घेतले आहे. या लाठीमारात अनेक अनुयायी गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान या प्रकारानंतर आश्रमस्थळी मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तर आश्रमाबाहेर अनुयायांनी गर्दी केली आहे.