शेतकरी कर्जमाफीसाठी पोलिस अधिकाऱ्याचा पुढाकार, १ महिन्याचा पगार पाठवून उचलला खारीचा वाटा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर प्रतिनिधी| पावसाळ्यामध्ये झालेली अतिवृष्टी आणि परतीच्या अवकाळी पावसाने राज्यातील शेतकरी पुरता हवालदिल झाला. यामध्ये हातातोंडाशी आलेली पिके वाया गेली. त्यामुळे राज्यातील तमाम शेतकऱ्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडुन कर्जमाफीची अपेक्षा आहे. परंतु सरकारला सुद्धा सध्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. हे लक्षात घेऊन माढ्यातील एका पोलिस कर्मचाऱ्याने शेतकऱ्यांना कर्जमाफी व्हावी यासाठी आपला एक महिन्याचा पगार देऊ केला असून याबाबतचे पत्र देखील त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे.

माढा पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक रमेश तुकाराम मांदे असे या पोलिस अधिकाऱ्याचे नाव आहे. सततचा दुष्काळ , त्यातच पावसाळ्यात झालेली अतिवृष्टी आणि त्यानंतर आलेला अवकाळी पाऊस यामुळे राज्यातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे शेतकरी पुर्ण हताश झालेला असुन कर्जबाजारी झाला आहे. या शेतकर्यांला आता सरकाराच्या मदतीची गरज आहे. त्यामुळे सरकारने कर्जमाफी करावी अशी आर्त हाक शेतकरी सरकारला करत आहेत. ही बाब लक्षात आल्यामुळे मांदे यांनी देखील आपला यामध्ये छोटासा वाटा असावा असे वाटले.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे  शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याबाबत सकारात्मक आहेत. परंतु सरकारला कर्जमाफी करताना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे दिसत आहे. यावर त्यांनी एक उपाय देखील सुचवला आहे. या आर्थिक अडणचणीतुन मार्ग काढण्याकरीता ”शासनाने राज्यात काम करणारे केंद्रातील असो अथवा राज्यातील सर्वच कर्मचाऱ्यांचा १५ दिवसांचा पगार तसेच लोकप्रतिनिधींचे मानधन यासाठी घ्यावे आणि शेतकरी कर्ज माफी करावी” असे सुचवले आहे. याची सुरुवात त्यांनी स्वतःपासून करून आपल्या एक महिन्याचा पगार मुख्यमंत्री यांच्याकडे पाठवला असून तो स्वीकारावा अशी विनंती देखील पत्राद्वारे केली आहे.