वॉशिंग्टन । अमेरिकेतील बहुचर्चित George Floyd हत्येप्रकरणी आणखी दोन पोलिस अधिकाऱ्यांना तेथील स्थानिक न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. अमेरिकेचे जिल्हा न्यायाधीश पॉल मॅग्नसन यांनी बुधवारी मिनियापोलिसच्या दोन माजी पोलिस अधिकाऱ्यांना जॉर्ज फ्लॉइडच्या हत्येतील त्यांच्या सहभागासाठी शिक्षा सुनावली.
न्यायालयाने पोलीस अधिकारी जे. अलेक्झांडर कुएंग याला तीन वर्षांच्या तर तू थाओ याला साडेतीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. फेब्रुवारीमध्येच कुएंग आणि थाओ यांच्यावर फ्लॉइडच्या नागरी हक्कांचे उल्लंघन केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता.
तुम्ही ती घटना थांबवू शकला असता
आपल्या स्टेट्मेंट्मध्ये न्यायालयाला असे आढळून आले की, हे दोन्ही पोलीस अधिकारी ती घटना थांबवू शकत होते. हे दोघेही माजी पोलीस अधिकारी डेरेक चॉविन याने फ्लॉयडवर केलेला अवाजवी बळाचा वापर थांबवू शकले असते. तसेच, या दोघांनी George Floyd ला वेळेवर वैद्यकीय उपचारही उपलब्ध करून दिले नाहीत.
सिगारेट खरेदी करण्यासाठी बनवले $20 चे बनावट बिल
कुएंग, थाओ आणि चौविन हे George Floyd हत्याकांडात अटक करण्यात आलेल्या त्या चार पोलिसांपैकी आहेत ज्यांनी सिगारेट विकत घेण्यासाठी $20 चे बिल बनावट बिल बनवले.
डेरेक चौविन हा मुख्य आरोपी
हे लक्षात घ्या कि, माजी पोलीस अधिकारी डेरेक चौविन हा George Floyd हत्येतील मुख्य आरोपी आहे. डेरेकने फ्लॉइडच्या मानेवर 10 मिनिटे गुडघे टेकले. तसेच न्यायालयाने देखील डेरेकलाच फ्लॉइडच्या हत्येबाबत दोषी ठरवले. ज्यासाठी त्याला 20 वर्षांपेक्षा जास्त तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
याबरोबरच या घटनेतील थॉमस लेन या चौथ्या अधिकाऱ्याला फेब्रुवारीमध्ये George Floyd च्या नागरी हक्कांचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले. तसेच त्याला अडीच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा देखील झाली.
प्रकरण काय आहे ???
जॉर्ज पेरी फ्लॉइड ज्युनियर हा एक आफ्रिकन-अमेरिकन माणूस होता ज्याची 25 मे 2020 रोजी मिनियापोलिस, मिनेसोटा येथे एका पोलीस अधिकाऱ्याने अटकेदरम्यान हत्या केली होती. यावेळी एका स्टोअरकडून फ्लॉइडने 20 डॉलर्सचे बनावट बिल दाखविल्याचीतक्रार करण्यात होती. यावेळी घटनास्थळी पोहोचलेल्या चार पोलिस अधिकाऱ्यांपैकी डेरेक चौविन याने George Floyd च्या मानेवर आणि पाठीवर 9 मिनिटे 29 सेकंद गुडघे टेकले. त्याच्या हत्येनंतर, पोलिसांच्या क्रूरतेविरुद्ध, विशेषतः कृष्णवर्णीय लोकांवरील अत्याचारा विरोधात अमेरिका आणि जागतिक स्तरावर जोरदार आंदोलन करण्यात आले. “मला श्वास घेता येत नाही” हे त्यांचे शब्द सुन्न करणारे ठरले .
हे पण वाचा :
Bank of Baroda च्या FD वरील व्याजदरात वाढ !!! नवीन दर तपासा
जिमचा स्टॅमिना वाढवण्यासाठी ‘हे’ पदार्थ खावा; अशक्तपणा येणार नाही
भारतातील IT Industry मधील सर्वाधिक पगार घेणारे 5 सीईओ कोण आहेत ???