परभणी जिल्ह्यात पोलिसांनी लाखो रुपयांच्या गुटख्याने भरलेला ट्रक पकडला

0
91
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

परभणी प्रतिनिधी। परभणी जिल्ह्यातील पाथरी शहरातील आठवड़ी बाजार परिसरात पोलिसांनी मोठी कारवाई करत गुटख्याने भरलेला ट्रक पकडला. या कारवाईत लाखो रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. पाथरी पोलिसांनी पहाटे ४ च्या सुमारास ही कारवाई केली.

पाथरी पोलिसांना गुटख्याच्या ट्रकबद्दलची माहिती मिळाली होती. त्यानंतर स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस पथक आठवडी बाजारात पोहचले. पहाटे ४ च्या सुमारास त्यांना ट्रक दिसला. त्यानंतर ट्रक थांबवून त्याची तपासणी केली असता त्यात अनेक प्रकारचे प्रतिबंधित गुटख्याच्या पिशव्या मिळाल्या. त्यात गुटखा भरलेला होता. दरम्यान,पोलिसांची चाहूल लागताच ट्रक चालकासह सर्वजणांनी तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी ट्रक चालक, गुटका विक्रेत्याला ताब्यात घेतल.

पोलिसांनी ट्रक आणि मुद्देमालासोबत सध्या दोघा जणांना ताब्यात घेतले आहे. याबाबत पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला हा गुटखा कोणी कोणासाठी पाठवला याविषयी पोलीस अधिक तपास करत आहेत.

इतर काही बातम्या-

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here