अहमदनगरमध्ये आणखी एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

0
74
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अहमदनगर प्रतिनिधी | अहमदनगर येथे सेक्स रॅकेटचे मोहोळ दाटले आहे का असा सवाल उपस्थित केला जात आहे. कारण मागेच औरंगाबादरोडवर सुरू असणाऱ्या सेक्स रॅकेटचा पडदा फाश करायला गेलेल्या पोलिसांवर दगडफेक केल्याची घटना ताजी असतानाच अहमदनगर मध्ये आणखी एक सेक्स रॅकेट उघडकीस आले आहे.

अहमदनगर मधील गांधी मैदानाशेजारी असणाऱ्या भगत गल्लीत सेक्स रॅकेट सुरु असल्याची वार्ता पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांना समजली. त्यांनी तात्काळ सध्या वेशात पोलीस पाठवून मिळालेल्या माहितीची शहनिशा करून घेतली. त्यानंतर मध्य रात्रीच्या सुमारास सशस्त्र पोलीस पथक घेऊन त्यांनी या ठिकाणी छापा टाकला. या छाप्यात तीन पीडित महिलांना सोडवण्यात त्यांना यश आले आहे. त्याच प्रमाणे सेक्स रॅकेट चालवणारी महिलेला देखील पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी प्रसंगावधान दाखवून तातडीने कारवाही केल्याने तीन महिलांची या दलदलीतून सुटका झाली आहे. तसेच या सेक्स रॅकेटची सूत्रधार असणाऱ्या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पोलीस या संदर्भात अधिक तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here