काश्मीरमध्ये दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीत सुरक्षा दलांनी वाचवला चिमुकल्याचा जीव!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

श्रीनगर । जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये CRPFच्या पथकावर दहशतवादी हल्ला झाला. यात एक जवान शहीद झाला तर एका वृद्ध सामान्य नागरिकाचा मृत्यू झाला. या घटनेतील काही फोटो समोर आले आहेत. एक फोटो मनाला स्पर्शून जातो, तर दुसरा फोटो हृदय पिळवटून टाकतो. दहशतवाद्यांच्या गोळीबारात एक जवान ३ वर्षांच्या चिमुकल्याला उचलून सुरक्षित स्थळी घेऊन जाताना दिसत आहे. तर दुसऱ्या एका फोटोमध्ये हाच चिमुकला आपल्या आजोबांच्या मृतदेहावर निर्विकार चेहऱ्याने बसलेला दिसत आहे.

दहशतवाद्यांच्या हल्ल्यात एका ६० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. या व्यक्तीच्या मृतदेहावर त्यांचा ३ वर्षीय नातू बसलेला फोटो समोर आला आहे. घटनास्थळावरील हा फोटो म्हणजे कोणीतरी काळजावर घाव घालावे असाच आहे. जमिनीवर पडलेलं मृत शरीर, कपडे रक्ताने माखलेले आणि मृतदेहावर बसलेला तीन वर्षांचा चिमुकला, असा हा फोटो आहे. यानंतर पोलिसांच्या टीममधील एका सदस्याने मुलाला उचलून एन्काऊंटर साईटपासून दूर नेलं. दहशतवाद्यांच्या गोळीबारादरम्यान समोर आलेला जवान आणि चिमुकल्याचा हा फोटो वेगाने व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये जवान मुलासोबत बोलताना दिसत आहे. चिमुकल्याच्या चेहऱ्यावरील निरागसता आणि जवान त्याच्याशी बोलताचा हा फोटो मनाला स्पर्श करतो.

चिमूकल्याला सुरक्षित वाचवल्यानंतर सोपोरचे एसएचओ अझीम खान यांनी सांगितलं कि, ”जेव्हा आम्ही घटनास्थळी पोहोचलो त्यावेळी तेथील दृश्य ही विचलित करणारी होती. त्यावेळी त्या लहान मुलाला वाचवण्याला आम्ही प्राधान्य दिलं. दहशतवादी गोळीबार करत असताना मुलाला वाचवणं आव्हानात्मक होत. आपल्या आजोबांसोबत हा लहान मुलगा हंदवाडा येथे जात होता.”

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

Leave a Comment