परभणी प्रतिनिधी | स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाला पालम हद्दीत अवैध रित्या चालणाऱ्या बिंगो कंप्युटर ऑनलाईन जुगाराविषयी माहिती मिळाल्याने पालम परिसरामध्ये मंगळवार दि 22 एप्रिल रोजी पोलीसांनी अचानक धाड टाकली.
यावेळी ऑनलाइन जुगार चालवणाऱ्या सय्यद रोशन उर्फ पप्पू सय्यद रहीम (वय २५) राहणार बुवकर गल्ली पालम आढळून आला. त्याच्याकडून जुगाराचे साहित्य रोख रक्कम 27 हजार 100 रुपये मध्यमान मिळून आला. सदर प्रकरणी त्याच्याविरुद्ध सय्यद सय्यद रहीम स्थानिक गुन्हे शाखा परभणी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पालम पोलिस ठाण्यांमध्ये अपराध क्रमांक 77 / 2019 कलम 12 मुंबई जुगार अधिनियमान्वये गुन्ह्याची नोंद केली आहे.
सदरील कारवाई पोलिस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय व अप्पर पोलिस अधीक्षक विश्वपानसरे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल सुरेश डोंगरे, संजय शेळके, किशोर चव्हाण यांनी केली आहे.