औरंगाबाद : पती-पत्नीमध्ये झालेल्या वादानंतर रागाच्या भरात पत्नीने उड्डाणपुलावरून उडी घेण्याच ठरविले ,ती पुलाच्या ग्रीलवर देखील चढली.मात्र त्याच वेळी कोरोनाची लस घेण्यासाठी निघालेल्या पोलिस पथकाच्या नजरेस पडली. पोलीसांनि क्षणाचाही विलंब न करता त्या महिलेला पकडले आणि तिची समजूत काढत तिचे समुपदेशन केले.पोलिसांनी क्षणाचाही विलंब केला असता तर मोठा अनर्थ घडला असता.
उपनिरिक्षक अमोल देवकर,गजानन सोनटक्के, हवलंदार मंगेश पवार,नरेंद्र गुजर हे पथकासह कोरोनाची लस घेण्यासाठी बारा वाजेच्या सुमारास जलनारोड वरून जात असताना सेव्हनहिल उड्डाणपुलावर एक तिशीतील महिला ग्रीलवर चढलेली होती. ते दृश्य पाहून पोलिसही गडबडले. लवकर त्या महिलेला थांबवले नाही तर ती पुलावरून उडी घेईल, या विचाराने पोलिसांनी तेथेतच वाहन थांबविले व धावत जाऊन त्या महिलेला मोठ्या चलाखीने पकडले. महिलेला पकडतात उपस्थितांनी सुटकेचा निश्वास सोडला.
त्या महिलेला आत्महत्येचा कारण पोलिसांनी विचारले असता पती-पत्नी मधील किरकोळ भांडणामुळे ती हा टोकाचा पाऊल उचलणार होती असे तिने कबुली दिली.पोलिसांनी ताफीने तिच्या पतीला घेऊन येत दोघांची संजय घालत समुपदेशन करीत महिलेचे मन वळविले. आता असे कधीच करणार नाही असे आश्वासन देखील तिने पोलिसांना दिले. लस घेण्यासाठी निघालेल्या पोलिसांनी तत्परता दाखवली नसती तर मोठा अनर्थ घडला असता. पोलिसांच्या या कामाची सर्वच स्थरातून स्तुती होत आहे.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Group